45 कोटींमध्ये बनवण्यात आला भारतातील सगळ्यात फ्लॉप सिनेमा; चित्रपटामुळे इंडस्ट्रीचं 99.99 % नुकसान

India's Flop Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील तो चित्रपट ज्यानं बॉक्स ऑफिसवर 1 लाख रुपयांपेक्षा देखील केली कमी कमाई...

दिक्षा पाटील | Updated: Jan 12, 2025, 12:59 PM IST
45 कोटींमध्ये बनवण्यात आला भारतातील सगळ्यात फ्लॉप सिनेमा; चित्रपटामुळे इंडस्ट्रीचं 99.99 % नुकसान title=
(Photo Credit : Social Media)

India's Flop Movie : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक चित्रपट बनवले आहेत ज्यांनी बक्कळ कमाई केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी इतिहासही रचला आहे. पण अनेक असे चित्रपट पाहायला मिळतात ज्याची कास्टिंग आणि VFX मध्ये वगैरे इतके पैसे लागले की त्यांच बजेटची जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त खर्च झाला. कोटींच्या संख्येनं हे चित्रपट तयार झाले आणि प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर त्याच्या अर्धा देखील कमावू शकले नाही. त्यानंतर लोकांनी अनेक गोष्टी सुनावल्या. आज आपण अशाच एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. हा चित्रपट 45 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. पण तोच चित्रपट भारतातील सगळ्यात जास्त फ्लॉप ठरला. इंडस्ट्रीमध्ये 99.99% नुकसान झालं. कारण कमाईची फक्त 60 हजार रुपये देखील होतं. 

हा चित्रपट 2023 मधला आहे. अजय बहल यांच्या चित्रपटाचा प्रदर्शनानंतर हा चित्रपट इतका फ्लॉप झाला की त्याला आजपर्यंत कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या चित्रपटाविषयी बोलतोय तर 'द लेडी किलर' आहे. भारताच्या बॉक्स ऑफिसवर सगळ्यात फ्लॉप चित्रपट ठरला. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकर हे कलाकार होते. 

हा चित्रपट क्राइम-थ्रिलर चित्रपट भूषण कुमारच्या टी-सीरिजनं बनवला होता. तर 2022 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. असं म्हटलं जातं की 2023 मध्ये या चित्रपटाचं पुन्हा एकदा शूटिंग झाल्यानं चित्रपटाचं बजेट वाढलं. त्यामुळे आकडा हा 45 कोटींवर पोहोचला. त्यांचं नशिब इतकं खराब होतं की प्रदर्शनानंतर कोणताही डिस्ट्रीब्यूटर मिळाला नाही. पहिल्या दिवशी भारतात फक्त 293 तिकटं बूक केले होते आणि त्याचं लाइफटाइम कलेक्शन हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 

अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकरचा चित्रपट फ्लॉप झाल्याचं कारण सांगितलं जातं. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की The Lady Killer अर्धवट प्रदर्शित झाली होती. त्याचा क्लायमॅक्स देखील पूर्ण शूट झाला नव्हता. दिग्दर्शकानं सुरुवातीला ही गोष्ट मान्य केली होती पण नंतर नकार दिला. निर्मात्यांनी डिसेंबर 2024 मध्ये या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगचं नेटफ्लिक्सवर डील देखील करण्यात आलं. पण त्यासाठी त्यांना चित्रपट हा नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित करायचा होता. कारण जर असं केलं नसतं तर त्यांच्यात झालेली डील ही अमान्य होती. त्यामुळेच त्यांनी अर्धवट चित्रपट प्रदर्शित केला. 

हेही वाचा : 'निर्दयी इंडस्ट्री...', Periods मुळे सेटवर उशिरा पोहोचल्यानंतर दिग्दर्शकानं दिलेल्या उत्तरावर अभिनेत्रीला बसला धक्का

चित्रपटाचं प्रमोशन देखील केलं नाही. ट्रेलर रिलीजसाठी इव्हेंट करण्यात आला पण त्यानंतर कलाकारांनी त्याचं काही प्रमोशन केलं नाही. मग जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यानं बॉक्स ऑफिसवर खूप खराब कामगिरी केली. तिकिट विकणं देखील बंद झालं होतं. त्यामुळे त्याची ओटीटी स्ट्रीमिंग देखील कॅन्सल करण्यात आलं. कारण नेटफ्लिक्सनं नकार देण्यास सुरुवात केली. अखेर, 'द लेडी किलर' हा चित्रपट सप्टेंबक 2024 रोजी टी-सीरीजच्या YouTube चॅनलवर फुकटात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाला आतापर्यंत युट्यूबवर 3.5 मिलियन वेळा पाहिला आहे. पण त्याचे कमेंट्स हे फक्त टीका करणारे किंवा ट्रोलिंगसारखे होते.