राजमाता जिजाऊंच्या नावावरुन मुलींसाठी खास आणि युनिक नावे, आऊसाहेबांप्रमाणे गुण अंगीकारले जातील

 Baby Girl Names on Jijau : राजमाता जिजाऊ साहेबांचा आज 427 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. यानिमित्ताने जिजाऊंच्या नावावरुन मुलींची खास नावे आणि त्याचे अर्थ. 

Updated: Jan 12, 2025, 10:39 AM IST
राजमाता जिजाऊंच्या नावावरुन मुलींसाठी खास आणि युनिक नावे, आऊसाहेबांप्रमाणे गुण अंगीकारले जातील  title=

बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी सिंदखेडराजा येथे आज राजमाता जिजाऊ साहेबांचा 427 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. सकाळी सूर्योदयापूर्वी जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जिजाऊ भक्तांनी जय जिजाऊ जय शिवरायचे नारे दिले . दिवसभर सिंदखेडराजा नगरीमध्ये उत्सवाचे वातावरण असणार आहे. जिजाऊंच्या जन्मस्थळापासून ते जिजाऊ सृष्टीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून. या मिरवणुकीत जिजाऊभक्त मोठ्या संख्येने भक्त सहभागी होणार आहे. .राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीवर त्यांचा जन्मदिवस साजरा करणे ही सिंदखेडराजासाठी अभिमानाची बाब आहे. या उत्सवातून शिवराय आणि जिजाऊंचे आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. 

या निमित्ताने जिजाऊंचे विचार अंगीकारुया. तसेच आपल्या मुलींसाठी निवडूया जिजाऊंच्या नावावरुन खास नावे. 

जिजाऊ
जिजाऊ म्हणजे आऊसाहेबांचं नाव लेकीला द्या. मग तिच्यात फरक पाहा. सर्वगणु संपन्न असं हे व्यक्तीमत्त्व. . जिजाऊंचे गुण आपल्या मुलीच्या जीवनात यावेत असं वाटत असेल तर लेकीसाठी 'जिजाऊ' हे नाव नक्कीच ठेवू शकता. 

जिजा 
'जिजा' हे नाव देखील ट्रेंडमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या नावावरुन हे नाव नक्कीच ठेवू शकता. 

शक्ती 
शक्ती या नावामध्ये त्याचा अर्थ दडला आहे. हिंदू पौराणिक कथांमधील हे अतिशय शक्तिशाली नाव आहे. दिव्य शक्ती असा देखील याचा अर्थ आहे. 

शक्तिरुपा 
शक्तिरुपा हे नाव युनिक आहे. शक्तीचे रुप, शक्तीची ताकद असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव चार अक्षरी असलं तरीही वेगळं आहे. 

ऐंदरी 
'ऐदरी' हे नाव 'इंद्रा' या नावावरुन घेण्यात आलं आहे. हिंदू पुराणशास्त्रानुसार देवाचा राजा इंद्र यांच्या नावावरुन हे नाव घेण्यात आलं आहे. या नावाचा अर्थ आहे सत्ता, ताकद आणि नेता. 

अपारजिता 
अपारजिता या नावाचा अर्थ आहे ताकद, शक्ती असा होता. ज्या मुलींमध्ये ताकद आणि प्रभावी असा गुण हवा असेल तर या नावाचा विचार करा. 

कियारा 
कियारा हे नाव अतिशय युनिक आहे. पण या नावाचा अर्थ शक्तिशाली, ताकदवान असा आहे. पण या नावातील अर्थ हा थेट जिजाऊंच्या गुणांशी संबंधित आहे. 

महिका किंवा मिहिका
महिका या नावाचा अर्थ आहे मॅजिकल पावर आणि दिव्य चैतन्य शक्ती. महिका हे नाव अतिशय युनिक आहे. मुलींसाठी या नावाचा विचार करु शकता. 

विराली
विराली हे नाव देखील वेगळं आहे. महिलांधील हिरो, शूर महिला असा याचा अर्थ आहे. युनिक नाव आहे