विमानतळावजवळ घर असणं आरोग्यासाठी धोकादायक, कसं ते समजून घ्या

House near airport: लोकांना नेहमीच अशा ठिकाणी घर घ्यावेसे वाटते जिथून विमानतळ, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ असतील. याचं कारण यामुळे प्रवास करणे सोपे होते आणि वेळही वाचतो. पण विमानतळाजवळ घर घेणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या नेमकं कारण काय?

Updated: Jan 11, 2025, 08:00 PM IST
विमानतळावजवळ घर असणं आरोग्यासाठी धोकादायक, कसं ते समजून घ्या title=

Living near airport is right or wrong: आजकाल लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण एक अशी समस्या आहे ज्याचा सामना सर्वांनाच करावा लागतो ती म्हणजे शहरातील वाहतूक कोंडी. ट्रॅफिकच्या त्रासामुळे लोक खूप कंटाळतात. याचं कारण रोजच्या वाहतूक कोंडीमुळे फार धावपळ करावी लागते. या समस्येचं समाधान म्हणून जास्त प्रवास करावा लागणार नाही अशा ठिकाणी घर घेण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का? एका नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की, विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकारासह अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. सावध व्हा, घराच्या वरून जाणाऱ्या विमानांचा आवाज तुम्हाला आजारी पाडू शकतो.

आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

विमानतळाजवळ राहण्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विमानांचा मोठा आवाज आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. सतत या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने हृदयाच्या रचनेत आणि कार्यक्षमतेत बदल होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयविकाराच्या आजारांचे प्रमाण वाढते. रात्रीच्या वेळेस जास्त आवाजाचा सामना केल्यास हृदयाच्या स्नायूंमध्ये कठोरता निर्माण होऊ शकते.

हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (UCL) वैज्ञानिकांनी एका संशोधनात असे नमूद केले आहे की, सतत विमानांच्या आवाजात राहणाऱ्या रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढतो आणि त्यामुळे हृदयाच्या रचनेत बदल होतो. यामध्ये असेही समोर आले की, जास्त आवाजामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका 3 पट अधिक असतो.

संशोधनात काय समोर आले?

या रिसर्चमध्ये विमानतळाजवळ राहणाऱ्या 3600 लोकांच्या आणि विमानतळापासून लांब राहणाऱ्या 21300 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावरून असे दिसून आले की, विमानतळाजवळ राहणे आरोग्यासाठी गंभीर परिणाम घडवू शकते. जर तुम्ही विमानतळाजवळ घर घेण्याचा विचार करत असाल तर या दुष्परिणामांचा विचार नक्की करा.

हे ही वाचा: Eye Care Tips : यूव्ही किरणांचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो का? जाणून घ्या

एअरपोर्टपासून किती अंतरावर असावे घर?

आता अनेक लोकांना हा प्रश्न पाडतो की  एअरपोर्टपासून किती अंतरावर राहणे आरोग्यासाठी चांगले असते. तर याबाबत असे सांगितले जाते की एअरपोर्टपासून दूर राहणे जास्त फायद्याचे आह.  ज्यामुळे विमानांच्या आवाज आणि प्रदूषणापासून बचाव करता येईल. तज्ज्ञांच्या मते, एअरपोर्टपासून किमान 6 मैल (सुमारे 10 किलोमीटर) अंतरावर राहणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या अंतरावर विमानांचा आवाज आणि हवेतील प्रदूषणाचा प्रभाव कमी होतो. यामुळे झोपेची समस्या, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा आणि इतर आजार होण्याचा धोका कमी होतो.