Actress got arrested : गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत स्वत: चं स्थान निर्माण करण्यासाठी मुंबईत येतात. पण खूप कमी लोक असतात ये आयुष्यात यशस्वी होतात. प्रत्येक व्यक्तीच्या स्ट्रगलीच गोष्ट आपण ऐकतो, अनेकांच्या अशा स्ट्रगलच्या गोष्टी आपण अनेकदा ऐकतो ज्यानं अनेकांना धक्का बसतो. त्यात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याविषयी आपण ऐकल्यानंतर मोठा धक्का बसतो. आता आपण अशाच एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत, जिची इतकी बिकट परिस्थिती झाली होती की तिच्यावर भीक मागण्याची आणि चोरी करण्यापर्यंतची वेळ आली.
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मिताली शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. इतकंच नाही तर ती एकेकाळी सगळ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांची पहिली पसंत देखील होती. पण आता तिची बिकट परिस्थिती आहे. खरंतर, तिचं आता आधीसारखे दिवस राहिले नाही, त्याचे कारण एकदा तिचे चित्रपट फ्लॉप होणं सुरु झालं आणि त्यासोबत तिला काम मिळणं देखील बंद झालं होतं. त्यामुळे ती मुंबईच्या लोखंडवालाच्या रस्त्यांवर भीक मागू लागली होती. काही वर्षांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की मुंबईच्या लोखंडवालाच्या रस्त्यांवर चोरी करताना तिला पकडण्यात आलं होतं. जवळपास 7 वर्षांपूर्वी तिला ओशिवाराच्या पोलिस स्टेशनमधील दोन लेडी पोलिसांनी अटक केली होती. असं म्हटलं जातं की महिला पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या तेव्हा तिनं सुरुवातीला त्यांना शिवीगाळ केला आणि मग त्यांना चावत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिताली शर्मा ही मुळची दिल्लीची आहे आणि ती भोजपुरी चित्रपटांसोबतच तिनं मॉडेलिंग प्रोजेक्ट्स देखील केले. अनेकांप्रमाणे मितालीनं देखील अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठीच ती घरदार सोडून मुंबईत आली होती. तिचा हट्ट पाहता तिच्या घरच्यांनी देखील तिच्यासमोर हात टेकून दिले होते.
हेही वाचा : वैभव मांगलेंची ‘नवरात्री’वरील पोस्ट व्हायरल; म्हणाले- ‘आता ही प्रथा कुठून सुरू झाली?’
मुंबईत काही चित्रपट आणि मॉडेलिंग असायन्मेंट्स केल्यानंतर तिला काही महिने काम मिळालं नाही. तर दुसरीकडे पैशांच्या कमतरतेमुळे ती डिप्रेशनचा शिकार झाली होती. असं म्हटलं जातं की वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत मिताली पोलिसांना भेटली होती, त्याला पाहून असा अंदाज बांधण्यात आला होता की गेल्या अनेक दिवसांपासून तिला नीट खायला मिळत नव्हते. जेव्हा पोलिसांनी तिला अटक केले तेव्हा तिनं त्यांच्याकडे सगळ्यात आधी जेवण मागितले. तिची अवस्था पाहता पोलिसांनी तिला एका मनोरुग्णालयात तुम्हाला दाखल केलं आणि आता ती कुठे आहे याविषयी जास्त माहिती नाही आहे.