Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये (ali baba dastaan e kabul) शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma news) अचानक जगाचा निरोप घेतला. कोणाच्या धानीमनी नसताना वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माने मृत्यूला कवटाळलं. Tunisha Sharma नं तिच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या (committed suicide) केली. या शेवटच्या क्षणाचा मेकअप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक प्रश्न निर्माण होतं आहेत.
पोलीस त्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असताना 'अली-बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेतील सेटवरील शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुनिषा तिचा मेकअप करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेकअप झाल्यानंतरच अभिनेत्रीने मेक-अप करून गळफास लावून घेतला होता. (Tunisha Sharma ali baba dastaan e kabul Makeup room Last Video viral on Social media)
या व्हिडिओमध्ये तुनिषा खुर्चीवर बसलेली आहे. हेअर स्टायलिश अभिनेत्रीचे केस ग्रूम करत आहे तर अभिनेत्रीसमोर आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत. या दोघांना पाहून ते अभिनेत्रीसोबत पुढच्या सीनबद्दल चर्चा करत असल्याचं समजतं.
मौत के कुछ घंटे पहले सेट पर तैयार होती टूनिशा#TunishaSharma pic.twitter.com/eKCEhyVJ4e
— Anil Yadav (@anilyadavmedia) December 24, 2022
हा व्हिडिओ पाहून अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. कारण या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर चिंतेचा किंवा टेन्शन दिसतं नाही आहे. तिच्या वागण्यात असं कुठेही जाणवत नाही आहे की, ती थोड्या वेळात एवढं मोठं पाऊल उचलेल. शिवाय मृत्यूला मिठी मारण्यापूर्वीच ती मालिकेतील आगामी सीन सर्वोत्तम कसा बनवायचा यावर सेटवर बोलताना दिसली. त्यामुळे ती अस्वस्थ आहे आणि आत्महत्येचा कोणताही विचार त्याच्या मनात येत आहे असं या व्हिडिओला पाहून वाटतं नाही.
Tunisha Sharma नं आत्महत्या करण्याआधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Tunisha Sharma Instragram) एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं 'जे त्यांच्या पॅशनने प्रेरित असतात ते थांबत नाहीत', असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान पोलिसांच्या तपासात याशिवाय Tunisha Sharma नं आतापर्यंत 'भारत के वीर पुत्र - महाराणा प्रताप' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'गब्बर पुंचवाला', 'शेर एक पंजाब - महाराजा रणजीत सिंग', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभान अल्लाह' आणि 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. इतकंच नव्हे तर Tunisha Sharma नं बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या 'फितूर' चित्रपटात काम केलं आहे.