Unfortunate Love Story Bollywood Actress Living Alone After 6 Affairs: बॉलिवूड आणि मनोरंजन सृष्टीमध्ये सतत प्रकाशझोतात असणं, भरपूर पैसा, भरपूर प्रसिद्धी असा एकंदरित थाट, अशी सर्वांचा समज आहे. मात्र अशाप्रकारे प्रत्येकाच्या नशीबामध्ये केवळ सुख, समाधान, शांती नसते. मनोरंजन श्रेत्रामध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिच्या आयुष्यावर एखादा चित्रपट तयार केल्यास तो कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच असेल. ही अभिनेत्री लग्न न करताच भांगेमध्ये सिंदूर लावूनच लोकांमध्ये वावरताना दिसली. तिचा हा अवतार पाहून अनेकांनी अमिताभ बच्चनबरोबर लपूनछपून लग्न केलं की काय असा प्रश्न पडला. काहींनी या अभिनेत्रीच्या आयुष्यात इतर कोणाची एन्ट्री झालीय की काय असाही प्रश्न पडला. या सर्व प्रश्नांची उत्तर अभिनेत्रीने एका पुरस्कार सोहळ्यात दिली होती.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे रेखा! अमिताभ बच्चन हे काही रेखाबरोबर नाव जोडले गेलेले पहिले अभिनेते नव्हते. रेखाचं नाव यापूर्वी अभिनेते जितेंद्र यांच्या नावाशी जोडलं गेलं. जितेंद्र यांच्याबरोबर रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. रेखा जितेंद्र यांच्यासोबतच्या नात्याबद्दल फार गांभीर्याने विचार करत होत्या, असं सांगितलं जातं. मात्र जितेंद्र हे विवाहित असल्याने पुढे काही झालं नाही आणि त्यांचं नातं अर्ध्यातच संपुष्टात आलं.
त्यानंतर रेखा आणि अभिनेते किरण कुमार यांच्या नात्याची चर्चा काही काळ चालली. किरण आणि विनोद मेहरा या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. किरण हे 50 ते 80 च्या दशकामधील प्रसिद्ध व्हिलन राहिलेल्या जीवन यांचे पुत्र आहेत. विनोद मेहरांबरोबर रेखाचं नातं ही चांगलेच चर्चेत राहिले. दोघांनी लपूनछपून लग्नही केलं होतं, असंही म्हणतात. मात्र रेखा यांनी प्रसिद्ध मुलाखतकार सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोद मेहरांबरोबर लग्न झाल्याचा दावा पूर्णपणे फेटाळला होता. या बातम्या खोट्या असल्याचं रेखा यांनी म्हटलं होतं.
रेखा यांचं सर्वाधिक चर्चेत राहिलेलं प्रकरण म्हणजे अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं नातं. दोघे पहिल्यांदा 'दो अनजाने' चित्रपटाच्या सेटवर एकत्र दिसून आले. रेखा मुक्तपणे आपलं अमिताभ यांच्यावर प्रेम असल्याचं कृतीमधून दाखवून देत होत्या. अमिताभ आणि रेखा यांनी लग्न केल्याच्या अफवा व्हायरल झाल्यानंतर जया बच्चन यांनी अमिताभ यांना रेखा असतील त्या चित्रपटात काम न करण्यास सांगितलं. रेखा या अचानक नीतू कपूर आणि ऋषि कपूर यांच्या लग्नाला भांगेत सिंदूर लावून पोहोचल्या तेव्हा त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये रेखा यांना तुम्ही भांगेत सिंदूर का लावता असं विचारण्यात आलं. त्यावर रेखा यांनी, "मी ज्या शहरातून येते तिथे सिंदूर लावणं ही फॅशन आहे," असं उत्तर दिलं.
रेखा यांनी नंतर दिल्लीमधील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी'मधील माहितीनुसार, मुकेश यांना रेखा यांनी अभिनय क्षेत्रात काम करणं आवडायचं नाही. याच कारणावरुन दोघे वेगळे झाले. यानंतर रेखा यांचं नाव संजय दत्तशी जोडलं गेलं. मात्र दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावलं. रेखा संजय दत्तच्या नावाचा सिंदूर लावायच्या असा दावाही लोकांनी केला. 'जमीन आसमान' नावाच्या चित्रपटामध्ये रेखा आणि संजय दत्त एकत्र काम करत होते तेव्हा त्यांच्या कथित अफेरअची जोरदार चर्चा सुरु झाली. संजय दत्तने या अफेअरच्या बातम्या आणि शक्यता फेटाळून लावल्या.
रेखा 'खिलाडियो का खिलाडी' चित्रपटामध्ये काम करत होत्या तेव्हा त्यांचं नाव अभिनेता अक्षय कुमारशी जोडलं गेलं. त्यावेळेस अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. अक्षय कुमार त्यावेळेस अभिनेत्री रवीना टंडनला डेट करायचा. रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन हे दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते होते. जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावल्ली यांचं अफेअर होतं. लग्न न करतानाच पुष्पावल्ली यांनी रेखा यांना जन्म दिला. त्यामुळेच लहानपाणापासून रेखा या वडिलांच्या प्रेमाला दुरावल्या.