'त्या' 3 मिनिटांनी जिंकलं प्रत्येकाचं मन... बाबासाहेब, बाळासाहेबही भारावले, पाहा Video

दीदी, त्यांच्या बहीण उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकार 'प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गौरवगीत गाताना दिसत आहेत.   

Updated: Feb 7, 2022, 05:58 PM IST
'त्या' 3 मिनिटांनी जिंकलं प्रत्येकाचं मन... बाबासाहेब, बाळासाहेबही भारावले, पाहा Video
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लता मंगेशकर यांचा प्रत्येक स्वर हा स्वर्गीय होता आणि यापुढेही असेल, असं उगाचच म्हटलं जात नाही. त्यांनी घेतलेली प्रत्येक तान त्यांचा प्रत्येक आलाप जणू काही वाळवंटातही बहर आणेल असाच. अलंकारीत भाषेत आजवर दीदींच्या गाण्याचं अनेकांनीच कौतुक केलं. पण, दीदींना गाण्यातूनच गौरवान्वित केल्याचा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? (Lata Mangeshkar)

सोशल मीडियावरील एका व्हिडीओतून हेसुद्धा पाहतचा येत आहे. जिथे एकिकडे दीदींची कर्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा गौरव होत असतानाच त्यांच्या सूरात एकरुप होत उपस्थितांनी दीदींचाही गौरव केला. 

शिवसेनेच्या एका जुन्या कार्यक्रमाचा व्हिडीओ दीदींच्या निधनानंतर समोर आला.

या व्हिडीओमध्ये दीदी, त्यांच्या बहीण उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकार 'प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गौरवगीत गाताना दिसत आहेत. 

फक्त दीदीच नाहीत, तर तिथे असणारा प्रत्येक व्यक्ती, शालेय विद्यार्थी हे गौरवगीत गुणगुणताना पाहून अंगावर काटा उभा राहतो. 

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची रचना असणाऱ्या या गीताचं सादरीकरण त्यावेळी खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेसुद्धा भारावले. 

अशा एखाद्या सादरीकरणाला याचीदेही याचीडोळा पाहणं म्हणजे भाग्यच म्हणावं... तुमच्यापैकी कोणी या कार्यकमाचा भाग होतं का? असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा.