विकी-कतरिनाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; प्रसिद्ध जोडीचं 10 कोटींचं नुकसान

नुकतीच या कपलबाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Updated: Nov 30, 2022, 07:46 PM IST
विकी-कतरिनाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; प्रसिद्ध जोडीचं 10 कोटींचं नुकसान title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला एकवर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी या जोडीने डिसेंबरमध्ये लग्न केलं आणि बॉलिवूडच्या सगळ्यात महागड्या लग्नापैकी हे लग्न मानू जाऊ लागलं. फोर्ब्स इंडियाच्या 2019 च्या लिस्टमध्ये दोघं टॉप 100 मध्ये सामिल होते. एका रिपोर्टनुसार या दोघांची संपत्ती 250 करोड रुपये इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत बंगले, फ्लॅट्स आणि कारचा समावेश आहे. मात्र नुकतीच या कपलबाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली. ज्यात दोघांना एका वर्षात 10 ते 12 करोडचं नुकसान झालं आहे.

विकीच्या जागी विजय देवरकोंडा
खरंतर, गेल्या एका आठवड्यात विकी आणि कतरिनाने असे दोन ब्रँड गमावले जे ते प्रमोट करायचे. मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की, एका मोठ्या ड्रिंक ब्रँडने विकी कौशलच्या जागी साऊथ स्टार विजय देवरकोंडा याला नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी बॉलीवूडमध्ये लॉन्च झालेला विजय देवरकोंडाचा लिगर हा चित्रपट भलेही फ्लॉप झाला असेल, मात्र चित्रपटाच्या जबरदस्त प्रमोशनमुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. विशेषतः तरुणांमध्ये तो प्रसिद्ध झाला. अशा परिस्थितीत या ब्रँडला वाटत होतं की देवराकोंडाला साइन करून त्याचा एकाच वेळी नॉर्थ आणि साऊथमध्ये फायदा होवू शकेल.

कतरिनाची जागा कियाराने घेतली
याचबरोबर एंडोर्समेंटसंबधित एक वाईट बातमी कतरिना कैफसाठी आली आहे. एका फ्रूट ज्यूस ब्रांडने तिची जागा नवीन होरोईनला दिली आहे. आपल्या ब्रँडचा नवा चेहरा निवडण्याचा या कंपनीने निर्णय घेतला आहे. बातमी आहे की, कबीर सिंह ते भूल भुलैय्या २ पर्यंत बोलबाला असणारी कियारा अडवाणीला कतरिनाच्या जागी फ्रूट ज्यूस ब्रांडसाठी आपला चेहरा बनली आहे. 

डील साइन झालं आहे. जाहिरात शूट होणार आहे. यानंतर कंपनी कियाराच्या नावाची घोषणा करेल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की या ब्रँडसोबत कतरिनाची वार्षिक डील 6 ते 7 कोटी रुपयांची होती, तर विकी कौशलला सॉफ्ट ड्रिंक ब्रँडकडून वर्षाला 4 ते 5 कोटी रुपये मिळायचे. अशा परिस्थितीत, कतरिना-विकी या जाहिरातींमधून एकत्रितपणे 10 ते 12 कोटी रुपये कमवत होते. आता हा ब्रँड हातातून निसटला तर त्यांना हा तोटा सहन करावा लागणार आहे.