'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात...

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या कारला मुंबईतल्या वांद्रे इथे अपघात झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 29, 2017, 06:52 PM IST
'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या कारला मुंबईतल्या वांद्रे इथे अपघात झाला. विद्या बालन मिटिंगसाठी जात असताना हा अपघात घडला. विद्याच्या कारला दुसऱ्या एक कारने जोरदार टक्कर दिली यात विद्याच्या कारची चांगलीच दुर्दशा झाली आहे. पण या अपघातातून विद्या थोडक्यात बचावली आहे. मात्र कारचे बरेच नुकसान झाले. 

विद्या बालनने नुकतेच चित्रपट 'तुम्हारी 'सुलु' चे शूटींग पूर्ण केले आहे. यात ती एका रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. विद्या सुमारे १० वर्षांनी पुन्हा एकदा रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी 'लगे रहो मुन्नाभाई' मधील तिची रेडिओ जॉकीची भूमिका फार लोकप्रिय ठरली होती. 'तुम्हारी सुलु'मध्ये ती एक गृहिणी म्हणून सुद्धा दिसणार आहे. 

या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या देखील भूमिका आहेत. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होईल.