गुडन्यूज : विराट-अनुष्काला कन्यारत्न

2017 मध्ये विराट आणि अनुष्काचं लग्न झालं.    

Updated: Jan 11, 2021, 04:39 PM IST
गुडन्यूज : विराट-अनुष्काला कन्यारत्न  title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी मुलीचे आगमन झालं आहे. आज दुपारी ही गोड बातमी खुद्द विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर अनुष्का आणि विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटने शेअर केलेल्या पोस्टला आतापर्यंत 26 हजार पेक्षा जास्त चाहत्यांनी लाईक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आम्हाला दोघांना सांगताना आनंद होत आहे, की आमच्या घरी मुलीचं आगमन झालं आहे. तुम्ही दिलेलं प्रेम आणि शुभेच्छांचे खूप आभार.' असं म्हणत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 

शिवाय अनुष्का आणि चिमुकली दोघांची प्रकृती देखील स्थिर असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.