मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यने आपलं वजन फार मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. गणेश आचार्यने अनेक दिवसांपासून वजन कमी करण्यास सुरूवात केली होती. 'हे ब्रो' या सिनेमासाठी गणेश आचार्यने मध्यंतरी ३० ते ४० किलो वजन वाढवलं असल्याचंही सांगण्यात येत होतं.
यानंतर मात्र गणेश आचार्यचं वजन आता फारच कमी झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील गणेश आचार्यच्या वजनाविषयी बोलताना म्हटलं होतं, की गणेशचं आकारमान कमी होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
मात्र तेव्हा कुठे तरी गणेश आचार्य यांनी वजन कमी करण्यास सुरूवात केली होती, तेव्हा गणेश आचार्य यांचं वजन एवढं कमी झाल्याचं जाणवत नव्हतं, मात्र दोन-तीन दिवसापूर्वीच्या यूट्यूबवरील एका व्हिडीओत गणेश आचार्यचं वजन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं दिसलं.
गणेश आचार्यने यासाठी नेमका काय उपाय केला याविषयी सोशल मीडियावर विचारलं जात आहे, मात्र गणेश आचार्यने जर व्यायाम किंवा आहाराने हे वजन कमी केलं असेल, तर ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आपला भिकारी नावाचा सिनेमा लवकरच येत असल्याचंही गणेश आचार्यने म्हटलं आहे.