मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा लोकप्रिय आणि सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच, अजय ज्या प्रकारे त्याची पत्नी, त्याची मुले, युग देवगण आणि न्यासा देवगण यांची काळजी घेतो त्याबद्दल त्याचे कौतुक केले जाते. अजयबद्दल एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा त्याच्या मुलाने त्याला कानशिलात लगावली.
एकदा 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत, अजयने त्याचं मुलगा युग देवगणसोबतच्या बाँडिंगबद्दल सांगितले आणि म्हणाला की 'तो त्याच्यासोबत मित्रासारखा वागतो. जेव्हा अजयला त्याच्या मुलाबद्दलची एक आठवण सांगण्यास सांगितले तेव्हा त्याने 'गोलमाल अगेन' चित्रपट पाहताना युगने त्याला कानशिलात लगावल्याची आठवण सांगितली.
तो क्षण आठवत अजयने खुलासा केला की, जेव्हा या चित्रपटात परिणीती चोप्राच्या पात्राचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचा मुलगा युग तो सीन पाहून ते सहन करू शकला नाही आणि रडू लागला. जेव्हा अजय, त्याची पत्नी काजोल, लेक मुलगी न्यासा आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी हे पाहिले तेव्हा ते हसू लागले. त्यानंतर जयने मुलाला विचारले, 'काय झाले?' त्यानंतर युगनं त्याला हळूच कानशिलात लगावल्याचे सांगितले. (When Ajay Devgan s Son Yug Slapped Him In Front Of Everyone The Whole Family Was Stunned)
अजय पुढे म्हणाला, 'तो जोरात हसला. काजोलला हसू अनावर झालं. परिणीती चोप्राच्या पात्राचा मृत्यूने त्याचे अश्रू ओघळत होते. तो माझ्या मांडीवर बसला होता आणि मी त्याला विचारले काय झाले आणि त्याने मला सांगितले की 'माझ्याकडे रडताना बघू नकोस' असे उत्तर दिले. हे खूप मजेदार आहे. माझ्या घरातील सदस्यही आजही यावर हसतात.
अजय त्याच्या मुलांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. अजय वेळोवेळी त्याच्या मुलांसोबत आणि पत्नी काजोलसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसतो. संपूर्ण कुटुंब अनेकदा एकत्र सुट्टीवर जाताना दिसतं. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.