मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranauat) आपल्या दमदार अभिनयामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे लोकप्रिय आहे. देशातल राजकारण असो किंवा बॉलिवूडचे मुद्दे, कंगना प्रत्येक बाबतीत आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडत असते. कंगना राणावत आणि करण जोहर यांच्यातील वादही जगजाहीर आहे. या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. पण या दोघांमधील वाद खूप जुना आहे. याबाबत कंगनाने एक व्हिडीओ शेअर केलाय.
कंगना राणावत बॉलीवूडमधील घराणेशाहीवर अनेकदा विधाने करत असते. ती दररोज चित्रपट माफियांनाही टार्गेट करते. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फिल्मफेअर अवॉर्डचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती करण जोहरकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पहा...
हा अवॉर्ड शो होस्ट करताना दिसत आहे आणि तो कंगनाला अवॉर्डसाठी कॉल करतो. पुरस्कार मिळाल्यानंतर, कंगना स्टेजवरून खाली उतरते. त्यावेळी करण कंगनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. ज्याकडे अभिनेत्री दुर्लक्ष करते आणि पुढे जाते. हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले, हाहाहा माझा स्वभाव आधीच खराब आहे. अभिनेत्रीने दुसर्या पोस्टमध्ये लिहिले की, हे माझे इंडस्ट्रीतील पहिले वर्ष आहे, मी किशोरवयीन होते पण वृत्ती एकच होती.
कंगना राणावत लवकरच 'धाकड', 'तेजस' आणि 'इमर्जन्सी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटांशिवाय कंगना 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा' आणि 'सीता- द इन्कारनेशन'मध्येही काम करणार आहे. यासोबतच कंगना 'टिकू वेड्स शेरू' या आणखी एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.