Ranbir Kapoor : सध्या बी-टाउन सेलेब्स त्यांच्या मुलांसोबत आणि वडिलांसोबत खूप शांत असतात. पण असे काही सेलिब्रिटी आहेत जे वडिलांशी बोलायलाही घाबरत होते. यामध्ये बी-टाउनचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा देखील समावेश आहे.
अभिनेता रणबीर कपूरने अनेकदा स्पष्ट सांगितले आहे की, तो त्याचे वडील ऋषि कपूर यांना नेहमी घाबरत होता. अलीकडेच, अभिनेता रणबीर कपूरने त्याचे बालपणीचे दिवस आठवले. रणबीर कपूरने सांगितले की, त्याचे वडील मुलांना काहीही सांगत नसले तरी काही कारणास्तव तो त्यांना प्रचंड घाबरत होता.
रणबीर कपूर ऋषि कपूर यांना का घाबरत होता?
अभिनेता रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, तो त्याच्या वडिलांना कशामुळे घाबरत होता. निखिल कामथ यांच्याशी संवाद साधताना अभिनेता रणबीर कपूर म्हणाला की, ते आमच्यावर कधीच ओरडले नाही. त्यांनी कधीही आमच्यावर हात उचलला नाही. परंतु आमच्या सभोवतालचा त्यांचा स्वभाव इतका अस्थिर होता की मी नेहमीच त्यांना घाबरत होतो.
आई-वडिलांमध्ये मारामारी
रणबीर कपूरने तो काळ आठवला जेव्हा त्याचे वडील ऋषि कपूर आणि आई नीतू कपूर हे दोघे आपापसात खूप भांडण करायचे. त्यावेळी रणबीर कपूर खूपच लहान होता. तो म्हणाला की, माझ्या बालपणीचा बराचसा काळ मी दोघांचे भांडण ऐकण्यात घालवला. त्यामुळे मला भीती वाटली, पण मला वाटते की ते दोघे खूप वाईट टप्प्यातून जात होते. मात्र, ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते.
रणबीर कपूरचा आगामी चित्रपट
अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या 'ॲनिमल' चित्रपटानंतर त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी सुरु केली आहे. रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या पौराणिक चित्रपटात भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ॲनिमल पार्क'मध्ये रणविजय आणि अजीज यांच्या भूमिकांमध्ये तो धोकादायक अॅक्शन करणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात देखील रणबीर कपूर, विक्की कौशल आणि आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.