Yeh Rishta Kya Kehlata Hai Kartik Goenka Got Mild Heart Attack : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री हिना खाननं काही दिवसांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे कळवले होते. आता या कार्यक्रमातील दुसऱ्या लीड कलाकारानं देखील याविषयी माहिती दिली आहे. या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणाऱ्या मोहसिन खाननं सांगितलं की गेल्या वर्षी त्याला माइल्ड हार्ट अटॅक आला होता आणि त्यानं याविषयी कोणालाही सांगितलं नाही.
मोहसिन खाननं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत हार्ट अटॅकविषयी सांगितलं होतं. त्याच्या आरोग्याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली होती. मोहसिननं सांगितला मोहसिननं सांगितलं की आता तो फिट आहे, पण ज्यावेळी असं झालं होतं तेव्हा तो चिंतेत होता.
मोहसिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात मोहसिननं सांगितलं की फॅटी लिव्हरची समस्या त्याला झाली होती. तर गेल्या वर्षी मला माइल्ड हार्ट अटॅक आला होता आणि मी सांगितलं नाही. खरंतर ते खूप जास्त वाढलं होतं. मी काही दिवसांसाठी अॅडमिट देखील होतो. त्यानंतर उपचार झाला आणि 2-3 रुग्णालय बदलावे लागले. पण आता सगळं काही नियंत्रणात आहे.
मोहसिननं सांगितलं की 'त्याची तब्येत बिघडल्यानं त्याच्या इम्यूनिटीवर परिणाम झाला होता. तो सतत आजारी पडायचा. पुढे जेव्हा त्याला फॅटी लिव्हरविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं की माहित नाही, याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. अल्कोहल न पिता देखील फॅटी लिव्हर होऊ शकतं. पण ते कसं होतं हे कळत नाही. मला वाटतं झोपण्याची योग्य वेळ नसने हे कारण असू शकतं.'
हेही वाचा : 4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?
मोहसिन खाननं शोमध्ये कार्तिक कार्तिक ही भूमिका साकारली होती तर शिवांगी जोशी ही त्याची सह-कलाकार होती. त्या दोघांच्या जोडीनं सगळ्यांची मने जिंकली. शिवांगीनं शोमध्ये नायराची भूमिका साकारली होती. शो व्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील या ऑन कॅमेरा जोडीचे लाखो चाहते होते. त्यांचे अनेक फॅन पेज देखील होते. आजही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते.