दोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक

Armaan Malik Karwa Chauth 2024 With Wife Payel and Kritika Malik : अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथ साजरा केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना केलं ट्रोल

दिक्षा पाटील | Updated: Oct 21, 2024, 05:27 PM IST
दोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक title=
(Photo Credit : Social Media)

Armaan Malik Karwa Chauth 2024 With Wife Payel and Kritika Malik : युट्यूबर अरमान मलिक हा नेहमीच चर्चेत असतो आणि त्याचं कारण ठरतात त्याचं खासगी आयुष्य. त्यातही त्याच्या दोन्ही पत्नी आणि त्यांचं एकमेकांसोबत असलेलं नातं हे नेहमीच चर्चेचं कारण ठरतं. त्याशिवाय त्याची लाइफस्टाइल देखील चर्चेचा विषय ठरते. दरम्यान, आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नींमुळे चर्चेत आला आहे. त्यानं यावेळी त्याच्या दोन्ही पत्नीसोबत करवा चौथचा उपवास ठेवला आहे. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. खरंतर पायल आणि क्रितिका दोघींनी अरमानसाठी उपवास ठेवला होता. त्या दोघींनी एकत्र सगळ्या विधींनुसार उपवास ठेवला होता. अरमाननं एक-एक करुन दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा उपवास सोडला. त्याचे फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एका फोटोत अरमाननं पहिली पत्नी पायलला किस केलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दुसऱ्या पत्नीसोबत रोमॅन्टिक होतो. त्या तिघांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर पायल आणि क्रितिकानं लाल रंगाची डिझायनर ओढणी घेतली होती. त्यांनी त्यांचा लूक हा मोठ्या झुमक्यांनी पूर्ण केला आहे. या दरम्यान, त्यांच्या लूकमुळे सगळीकडे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. तर त्यांचे काही चाहते त्यांची स्तुती करते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या प्री-वेडिंगला सुरुवात; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'एका चांगल्या कुटुंबाला...'

अरमान मलिकनं दोन्ही पत्नींचा उपवास सोडल्यानंतर त्यांच्यासोबत रोमॅन्टिक झाल्यानंतर लोक संतापले आहेत. 'दादा, हिंदू संस्कृतीमध्ये चप्पल काढून पूजा करतात. रीलच्या चक्करमध्ये इतकही विसरु नका.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हा अरमान मलिक स्त्रींसारखा का दिसतो.' तिसरा नेटकरी म्हणाली, 'चप्पल घालून कोण पूजा करतं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पूजा कोण करतं? टाईम वर कमीत कमी चप्पल आणि बुटं काढा.'