जरीन खानची आई ICU मध्ये दाखल; तब्येत पुन्हा बिघडली

बॉलीवूड अभिनेत्री जरीन खान अनेक दिवसांपासून तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहे

Updated: Apr 27, 2022, 09:33 PM IST
जरीन खानची आई ICU मध्ये दाखल; तब्येत पुन्हा बिघडली title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जरीन खान अनेक दिवसांपासून तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहे. आता पुन्हा तिच्या आईची तब्येत बिघडली आहे. अशा गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. झरीनने स्वतः तिच्या सगळ्या चाहत्यांना तिच्या आईच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. यासोबतच अभिनेत्रीने सर्वांना प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं आहे.

झरीनने लिहिली ही गोष्ट
जरीनने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिची एक पोस्ट शेअर केली आहे.

त्यात तिने लिहिलं आहे की, 'माझ्या आईची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. काल रात्री तिला पुन्हा दवाखान्यात न्यावं लागलं. ती सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. तुम्हा सर्वांनी माझी आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करावी ही विनंती.

गेल्या महिन्यातही खालावली होती तब्येत 
याआधी झरीनच्या आईची तब्येत गेल्या वर्षीही खूप खालावली होती.  त्यानंतर महिनाभराहून अधिक काळ हॉस्पिटलच्या तिला फेऱ्या माराव्या लागल्या. त्यानंतर मार्च महिन्यात प्रकृती खालावल्याने तिला हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.