मुंबई : अनेकदा नातं हे सत्यावर अवलंबून असतं त्यामधून खोटं बोलणं टाळा असा सल्ला तुम्हांलाही अनेकदा मिळाला असेल पण काही गोष्टींना अपावाद असतात. त्यानुसार, नात्यांमध्ये काही गोष्टींबाबत खोटं बोलूनही फायदा होतो. त्यामुळे तुम्हीच पहा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हांला फायदा होऊ शकतो.
विश्वास दाखवा -
जीवनात चढ-उतार येणं स्वाभाविक आहे. कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते
प्रत्येकामध्ये काहीना काही दोष असतात. मात्र तुमच्याही साथीदारामधध्ये असलेल्या त्या कमतरतेबाबत बोलणं टाळा. उलट त्यांच्यावर तुमचा विश्वास असल्याचं सांगितल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढेल.
जेवणाला दाद द्या -
तुमचा साथीदार पहिल्यांदाच एखादा पदार्थ बनवत असेल किंवा त्याला नियमित पदार्थ बनवण्याची सवय नसेल तरीही तुमच्यासाठी प्रेमाने बनवलेल्या पदार्थांमध्ये चूका काढत बसू नका. त्यांच्या मेहनतीला दाद द्या. पदार्थ कसाही झालेला असला तरीही त्याचं कौतुक करा.
कपड्यांंची प्रशंसा करा -
अनेकदा तुम्हांला साथीदारची शॉपिंग आवडली नसेल पण जेव्हा ती व्यक्ती त्या कपड्यांमध्ये खूष असते तेव्हा तुम्ही टीका करण्यापेक्षा त्यांचं कौतुक करा. यामुळे त्यांच्या चेहर्यावर मस्त स्माईल येईल. ते तुमच्या दोघांसाठीही खास असेल.
चूक कबुल करा -
प्रत्येक गोष्टीवर साथीदारासोबत भांडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीलाही समजून घ्या.कधीकधी थोडी पडती बाजू सांभाळायला शिका. यामुळे वाद टोकाला जाणार नाही. अनेकदा चूक समजून घेतली की समोरच्या व्यक्तीलाही त्याचा थोड्या वेळाने पश्चात्ताप होतो.