मुंबई : सहसा कोणतेही कपडे निवडत असतानाकाही गोष्टी तरुणी किंवा महिला विशेष लक्षात घेतात. यामध्ये एक निकष सर्वांच्याच प्राधान्यस्थानी असतो, तो म्हणजे काखांमधील काळेपणा ड्रेस किंवा कपड्यांच्या स्लिव्ह्जमधून दिसत नाही ना?
underarms काळे असण्याची समस्या, जवळपास शंभरापैकी 60 टक्के महिलांना सतावत असते. पण, तुम्ही कधी यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
मुळात तुम्हीही अशा काही चुका करता ज्यामुळं काखा काळसर होत जातात. त्यामुळं आता उपाय शोधण्यासाठी धडपड करण्यापेक्षा या चुका टाळलात तर, काखा काळ्या होण्याचं प्रमाण सहजपणे कमी करता येऊ शकतं.
तुम्हीही करताय का या चुका?
- सतत वॅक्स केल्यामुळे काखेतला काळसरपणा वाढतो. शरीराच्या या भागात वॅक्सचा अधिक वापर केल्यामुळं हा काळसरपणा वाढू लागतो.
- घट्ट कपडेही नकळतच काखेत काळेपणा वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
- अंघोळीनंतर लगेचच पावडर लावणं, डिओ लावणं, परफ्यूमचा वापर करणं याचा परिणाम काळवंडलेल्या काखांमध्ये दिसून येतो.
- मोठ्या प्रमाणात धुम्रपान करण्याची सवय असल्यास हायपरपिग्मेंटेशनमुळे ओठांसोबतच तुम्हाला काळेतील काळसरपणाचाही सामना करावा लागतो.
तुम्हीही नकळतच अशा काही चुका करत असाल, तर आताच थांबा चांगल्या बदलांच्या दिशेनं वाटचाल करा.