Parineeti Chopra : शुक्रवारी संध्याकाळी परिणीती चोप्राने तिची चुलत बहीण प्रियंका चोप्रासोबतच्या संभाव्य मतभेदाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. परिणीती चोप्रा आणि पती राघव चढ्ढा हे प्रियंका चोप्राच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहिले. दोघांची लग्नस्थळी पोहोचतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे कौटुंबिक उत्सवाचा भाग होण्यासाठी अत्यंत आनंदी आणि उत्साहित दिसत होते.
यावेळी परिणीती चोप्राने लाल रंगाचा ब्लाउज आणि जॅकेटसह एथनिक स्कर्ट परिधान केला होता. ज्यामध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती. तर पती राघव चढ्ढाने प्रियंका चोप्राच्या भावाच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि तपकिरी नेहरू जॅकेट परिधान केले होते.
परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ
अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वरमाला समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, Deal is sealed! #SidNee. अभिनेत्रीच्या स्टोरीमधील व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि त्याची पत्नी एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. या सोहळ्यादरम्यान प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास आणि आई मधु चोप्रा देखील स्टेजवर दिसले.
तर सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा कारमधून उतरताना दिसत आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये म्हटलं आहे की, एक महान सुपरस्टार येत आहेत. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, दिल्ली निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर हे भाई साहेब बॉलिवूडमध्ये जातील.
तर काही दिवसांआधी परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर मतभेदाच्या अफवा सुरु झाल्या होत्या. अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले होते की, वास्तविक आपण खरोखरच उधार घेतलेल्या वेळेवर आहोत. त्यामुळे तुम्हाला निवडणाऱ्या लोकांना निवडा आणि इतर सर्वांना राहू द्या असं तिने म्हटले होते.