Mahakumbh 2025: अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांनी महाकुंभमेळ्यात भाग घेतला आणि त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केले. यावेळी राजकुमार राव आणि पत्रलेखा, स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांच्या कॅम्पमध्ये उपस्थित होते. राजकुमारने आपल्या अनुभवावर भाष्य करताना सांगितले की, 'इथले वातावरण खूपचं सुंदर आहे गेल्या वेळी मी महाकुंभाला आलो होतो तेव्हा माझं आयुष्य खूप बदललं. आम्ही स्वामीजींचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही पवित्र स्नान करणार आहोत... हे इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाते... माझ्या शुभेच्छा सर्व लोकांना आणि प्रशासनाला आहेत...' ' त्यांना पवित्र स्नान घेतल्याचा अनुभव अत्यंत खास आणि आध्यात्मिक ठरला.
परमार्थ निकेतन आश्रमाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात राजकुमार राव, पत्रलेखा आणि दिव्य योगिनी इरा त्रिवेदी यांचे महाकुंभ शिबिरस्थळावर स्वागत करण्यात आले आहे. या विशेष भेटीद्वारे परमार्थ निकेतनचे वतीने स्वामी चिदानंद सरस्वतीजी आणि साध्वी भगवती सरस्वतीजी यांच्या आशीर्वादाने पवित्र संगम स्नान घेतले गेले. त्यांनी लिहीले, 'परमपूज्य स्वामी चिदानंद सरस्वतीजी @pujyaswamiji यांच्या पवित्र आशीर्वादाने आणि पूज्य साध्वी भगवती सरस्वतीजी यांच्यासोबत एका खास संगम स्नानाने, प्रिय आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव @rajkummar_rao आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री पत्रलेखा @patralekhaa आणि दिव्य योगिनी इरा त्रिवेदी @iratrivedi यांचे परमार्थ निकेतन महाकुंभ शिबिरस्थळावर स्वागत करताना खूप आनंद होत आहे.'
महाकुंभ 2025, जो 13 जानेवारीपासून सुरू होऊन 26 फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत चालेल, हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा आहे. या कार्यक्रमात लाखो भाविक सहभागी होतात, ज्यामुळे यंदा उपस्थिती आणि सहभागाचे नवे विक्रम प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा: Loveyapa Movie Review: क्यूट लव्ह स्टोरी आणि बराच गोंधळ, कसा आहे Loveyapa चित्रपट?
महाकुंभमेळा आपल्या अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे विविध देशांतील भाविक, साधू, महात्मे आणि सेलिब्रिटींना आकर्षित करत आहे. विशेष
म्हणजे यंदाच्या महाकुंभात विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, साधना, भव्य पूजा आणि येरझेर व्रतांच्या माध्यमातून एक अभूतपूर्व वातावरण निर्माण करण्यात आले आहे.