मुंबई : ही गोष्ट आहे जानेवारीच्या सुरूवातीची. जेव्हा चीनमधील वुहान शहरात एका नव्या कोरोना व्हायरलची गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला जात होता. वुहानमधील एक डॉक्टर आपल्या डॉक्टर साथीदाराला या नव्या व्हायरसची माहिती देण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र त्यांचा हा प्रयत्न फेल ठरला. पोलिसांनी डॉक्टरांना गप्प राहण्याचा इशारा दिला. असं होऊनही काही आठवड्यांनी डॉक्टर ली वेनलियान्गने हॉस्पिटलमध्ये बसून एक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट केली. या व्हिडिओनंतर डॉक्टरला एका हिरोचा दर्जा मिळाला. सुरूवातीला जेव्हा कोरोना व्हायरसची माहिती दिल्यावर स्थानीक प्रशासनाने यावर असमान्य प्रतिक्रिया दिली.
मी डॉक्टर ली वुहान सेंट्रल रूग्णालयात डोळ्यांचा डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. मी सात अशा केस पाहिल्या ज्यामधून सार्स सारख्या नवीन व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळाली होती. 2003 मध्ये सार्स व्हायरसमुळे वैश्विक धोका निर्माण झाला होता. असं सांगितलं गेलं की, व्हायरस वुहानच्या हुनान सीफूड मार्केटमध्ये पसरला आहे. 30 डिसेंबर रोजी डॉक्टर ली यांनी एका डॉक्टरशी ग्रुप चॅट करताना या व्हायरसची माहिती दिली होती. मात्र तेव्हा डॉक्टर ली यांना कल्पना नव्हती की, हा कोरोनो व्हायरस आहे.
वीबोवर लिहिलेल्या पोस्टवर डॉक्टर ली यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 10 जानेवारी रोजी डॉक्टर ली यांना खोकला झाला. त्यानंतर ताप आला. दोन दिवसांत त्यांची तब्बेत इतकी बिघडली की त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. एवढंच नव्हे त्यांचे आईवडिल देखील आजारी पडले. त्यांना देखील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर 20 जानेवारी रोजी 10 दिवसांनी चीनमध्ये कोरोना व्हायरसची घोषणा करण्यात आली. डॉक्टर ली यांच म्हणणं आहे की, अनेकदा त्यांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली मात्र ती निगेटीव आली.
30 जानेवारी रोजी डॉक्टर ली यांनी आणखी एक पोस्ट केली. 'आज न्यूक्लिआय टेस्टचा निकाल येत असून त्याला सकारात्मक आहे.' आता यावरची शंका दूर झाली असून चौकशी पूर्ण झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी समर्थन दिले असून त्यांच सांत्वन देखील करण्यात आलं आहे. काहींनी डॉक्टर ली यांना 'हिरो' असं संबोधलं आहे.