बनावट पनीर ओळखण्याची सोपी पद्धत

अनेक गोष्टींमध्ये भेसळ करण्यात येते.

Updated: Jul 7, 2021, 03:20 PM IST
 बनावट पनीर ओळखण्याची सोपी पद्धत title=

मुंबई : आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ असते. मग ते मिठाई असो किंवा दूध...यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये भेसळ करण्यात येते. याचप्रमाणे पनीरमध्येही भेसळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर पनीर खाण्यास फार आवडत असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, सध्या प्रत्येक घरात पनीरचा वापर केला जातो. सहसा पनीरची चमक योग्य आहे की बनावट आहे याचा सहज अंदाज लावता येत नाही. परंतु खाल्ल्यानंतर, आपल्याला त्याची चव कळू शकते. आणि त्यावरून की पनीर भेसळयुक्त आहे की नाही ते. परंतु सर्वात मोठा प्रश्न आहे की खरेदी करताना पनीर बनावट आहे की नाही हे कसं तपासावं.

पनीर बनावट आहे की चांगलं हे तपासण्याच्या तीन पद्धती आहेत.

पहिली पद्धत

डॉ. रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या हातात पनीरचा तुकडा स्मॅश करून पहा. जर पटकन पनीरचा तुटून खाली पडच तर ते पनीर बनावट आहे. कारण त्यामध्ये उपस्थित स्कीम्ड मिल्क पावडर जास्त दबाव सहन करू शकत नाही, म्हणून ते स्मॅश केल्यावर लगेच तुकडे पडू लागतात.

दुसरी पद्धत

बनावट नसलेलं पनीर गच्च नसतं. जेव्हा की बनावट पनीर गच्च आणि कडक असतं. या पनीरचं सेवन करतेवेळी ते रबरासारखं खेचलं जातं.

तिसरी पद्धत

पनीर पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. आता त्यावर आयोडीनचे काही थेंब घाला. असं केल्यावर, जर चीजचा रंग निळा झाला तर आपल्या चीजमध्ये भेसळ आहे आणि आपण ते खाणं टाळावं.