High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश

Cholesterol Lowering Fruit : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. पण हाच कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी... 

Updated: Jan 30, 2023, 01:13 PM IST
High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश  title=
Cholesterol Lowering Fruit

Avocado For High Cholesterol : कोलेस्टेरॉल (Cholesterol) शरीरील नकोसा आजार असला तरी कोलेस्टेरॉल हा रक्तात असलेला मेणासारखा पदार्थ आहे, जो पेशी आणि हार्मोन्स तयार होण्यास मदत करतो. कोलेस्टेरॉलची सामान्य पातळी 200mg/dL पेक्षा कमी असते. जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा ते रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि ब्लड फ्लोवर परिणाम करते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. (Cholesterol) कोलेस्टेरॉलची समस्या सातत्याने वाढत असून सर्व वयोगटातील लोक हाय कोलेस्टेरॉलचे बळी ठरत आहेत. कोलेस्टेरॉलची समस्या असल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही. घरबसल्या या समस्येवर सहज नियंत्रण ठेवू शकता. यासाठी कोणत्या फळाचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया... 

Avocado म्हणजे काय? 

जगभरातील लोकप्रिय फळांमध्ये एवोकाडो फळांचा समावेश केला जातो. तसेच या फळांचा सामावेश औषधी मध्ये देखील केला जातो. आशिकीएवोकॅडो हे एक फळ आहे. एवोकॅडो खारट आणि गोड या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. एवोकॅडोमध्ये उच्च प्रमाणात फॅटी ऍसिड्स असतात आणि त्यात cholesterol ची पातळी खूप कमी असते.  

वाचा: Google च्या 'या' निर्णयामुळे अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सची होणार चांदी, कसं ते जाणून घ्या!

Avocado खाण्याचे फायदे

Avocado फळांमध्ये आढळणाऱ्या पौष्टिक तत्वां मुळे हे फळ आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरते. तसेच आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना ह्रद्य संबंधीच्या गंभीर समस्या पाहता एवोकॅडो चे सेवन उपयुक्त ठरेल. एवोकॅडो मध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर कमी करणारे गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. 

Avocado फळाचे तोटे

जर या फळाचे अति प्रमाणामध्ये सेवन केले तर उलट्या येण्याची शक्यता आहे. तसेच मळमळणे, मायग्रेन यांसारख्या समस्यादेखील होण्याची शक्यता आहे. 

Avocado मध्ये पोषक घटक आढळतात

Avocado मध्ये सुमारे 240 कॅलरीज, 13 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम प्रथिने, 22 ग्रॅम चरबी (15 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड, 4 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड, 3 ग्रॅम सॅच्युरेटेड), 10 ग्रॅम फायबर आणि 11 एमडी ग्रॅम असते. यामुळेच हे फळ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खुपच उपयुक्त ठरते.  

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फळ खा

रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एवोकॅडोचे सेवन केले जाऊ शकते. हे एक महागडे फळ आहे, पण गेल्या काही वर्षांत हे फळ खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. यामुळे हृदयाचे, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच शरीराच्या सर्वांगीण विकासातही याचा खूप फायदा होतो.