मुंबई : सुरवातीच्या काळात व्यक्तीशी बोलण्यासाठी चिठ्ठीचा वापर केला जायचा, जेथे लोक आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या. परंतु त्यानंतर त्याची जाग फोन आणि मेसेजेसने घेतली. ज्यामुळे हल्ली लोक एकमेकांशी बोलण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर करु लागले. त्यांपैकी सर्वाजास्त वापरले जाणारे आणि सोयीस्कर म्हणजे मेसेज. जेव्हा डिजिटायजेशन झाले, तेव्हा लोक एकमोकांची विचारपुस करण्यासाठी मेसेजसचा वापर करु लागले. याचा फायदा प्रेमी जोडप्यांना जास्त होऊ लागला कारण ते एकमेकांशी सहज बोलू शकत आहेत.
परंतु मेसेजेस करताना मुलांच्या मनात एक प्रश्न नक्की पडतो की, माध्यम इतक सोपं आणि फास्ट झालं असलं तरी देखील मुली मेसेजवर लेट रिप्लाय का करतात?
त्यांच्या उशीरा उत्तराची अनेक कारणे असू शकतात. याचा अर्थ असा नाही की ते रिलेशनशिपमध्ये आहेत. चला यामागील रहस्य जाणून घेऊया, ज्यावरून तुम्हाला सहज कळेल की, मुली उशिरा का उत्तर देतात.
अनेकदा असं होतं की, पहिल्या भेटीनंतर आपण मुलींकडून इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅप नंबर घेतो. यानंतर मुलं अशा चुका करतात की, ते एकमेकांना जास्त न ओळखता जास्तीचेत्र मेसेज करू लागतात आणि एकाच वेळी अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मुलींना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे. म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी करणे टाळावे.
काही मुली दीर्घकाळ राहिल्यानंतर जोडीदारासोबत ब्रेकअप करतात. त्यानंतर तिला पूर्ण वेळ स्वत:ला द्यायचा आहे. नात्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. परंतु काही मुले त्यांची परिस्थिती समजून घेत नाहीत आणि त्यांच्याशी सतत त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतात. ज्यात त्यांना अजिबात रस नाही. ज्यामुळे मुली अशा मुलांशी बोलणं टाळतात.
तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मुली खोट्या मुलांना लवकर ओळखतात. काही लोक मुलींची खोटी प्रशंसा करू लागतात. यामुळे त्यांना समजू लागते की, तुम्ही खोटी प्रशंसा करत आहात आणि त्यांची आवड तुमच्यावरच संपते.
काही मुलींना अनोळखी मुलांशी बोलणे आवडत नाही किंवा कदाचित ते व्यस्त आहे, ज्यामुळे ती वेळेवर उत्तर देऊ शकत नाही. त्याचा चुकीचा अर्थ काढणे योग्य होणार नाही, जर तुम्हाला चांगले आणि सज्जन मित्र बनायचे असेल तर त्यांना आदर द्या. तसेच त्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांच्याशी बोला. यामुळे सर्व काही चांगले होईल आणि तुमच्या दोघांमध्ये दीर्घ चर्चा होईल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)