मुंबई : आजकाल असे अनेक तरुण मंडळी आहेत ज्यांना लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे. पण त्यांना त्यासाठी योग्य उपाय सापडत नाही. पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतील, तरच आपण चांगल्या परिणामांची अपेक्षा करू शकतो.
GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडातील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी आपण दररोज खाण्यापिण्याची सवय बदलली पाहिजे.
सकाळी उठल्याबरोबर वजन कमी करायला सुरुवात करावी कारण त्याचा परिणाम दिवसभर दिसून येईल. ज्या लोकांना सकाळी पुरी भाजी, पराठे किंवा इतर कोणतेही तेलकट पदार्थ खाण्याची सवय आहे त्यांनी आजच बदला. त्याऐवजी, ताजी फळे किंवा इतर कोणत्याही आरोग्यदायी आहाराचं सेवन सुरू करा. यामुळे शरीरातील चरबी कमी होईल.
भारतातील बहुतेक लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा दूध आणि साखरेचा चहा प्यायला आवडतो, मात्र यामुळे वजन वाढतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही ग्रीन टीचं सेवन केलं तर शरीरात चांगले बदल घडतील.
फळ खाण्याचे अनेक मार्ग असू शकतात, तुम्ही त्याचा रस काढून पिऊ शकता. त्याचा शेक प्यायल्यास शरीराला त्रास सहन करावा लागू शकतो, कारण फळ आणि दुधाचा प्रभाव वेगवेगळा असतो. यामुळे पोटात त्रास होतो आणि त्यामुळे वजन वाढतं.
गोड आणि मिठाईपासून आइस्क्रीम खायला प्रत्येकाला आवडतात. पण जर तुम्ही साखरेचं किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन जास्त केलं तर वजन वाढण्यास अजिबात उशीर होत नाही, त्यामुळे मिठाईचं सेवन मर्यादित प्रमाणात करा.