किचनमधील 'हे' पदार्थ कमी करतील Cholesterol ची पातळी!

तुमच्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.

Updated: Sep 28, 2022, 07:12 AM IST
किचनमधील 'हे' पदार्थ कमी करतील Cholesterol ची पातळी! title=

मुंबई : कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे, परंतु खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हे वाढतं. अशा परिस्थितीत जर कोलेस्ट्रॉल कमी झालं नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जेव्हा शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा हृदयविकाराचा धोकाही वाढतो कारण खराब कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतं.

पण तुम्हाला माहितीये का की, काही गोष्टी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. तुमच्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

या गोष्टी कमी करतात शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल

लिंबू

तुम्हाला माहितीये का लिंबू तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतं. त्याचबरोबर लिंबू तुमच्या शरीरातील खराब बॅक्टेरिया दूर करण्याचं काम करतं. त्यामुळे आहारात लिंबाचा समावेश जरूर करावा. यासाठी तुम्ही लिंबूपाणी खाऊ शकता किंवा सॅलडवर लिंबू पिळू शकता.

आवळा

आवळ्यामध्ये भरपूर फायबर असतं जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. आवळा फक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच फायदेशीर नाही तर पोटासाठीही फायदेशीर आहे. 

जिरं

जिरे हे प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत करतं. दुसरीकडे, जर तुम्ही दररोज याचे सेवन केलं तर ते तुमच्या पोटासाठी देखील फायदेशीर ठरतं.

लसूण

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या भेडसावत असेल तर तुम्ही लसणीचं सेवन करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही लसूणीचं कच्च्या पद्धतीनेही सेवन करू शकता.