लो बीपीचा त्रास असणार्‍यांसाठी खास डाएट टीप्स

केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. 

Updated: Aug 14, 2018, 09:31 AM IST
लो बीपीचा त्रास असणार्‍यांसाठी खास डाएट टीप्स  title=

मुंबई : केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. लो बीपीदेखील आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे धावपळीच्या आणि तणावग्रस्त होत चाललेल्या आजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हांला लो बीपीचा त्रास असल्यास त्याकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे. 

लो बीपी (रक्तदाब कमी होणं) लक्षणं  

- चक्कर येणं
- थकवा जाणवणं
- श्वास घ्यायला त्रास होणं
- अंधुक दिसणं
-त्वचा चिकट होणं 

रक्तदाब सतत 90/60 एमएमएचजी किंवा त्यापेक्षा कमी असणं हे लो बीपीचं लक्षण आहे. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. 

लो बीपीचा त्रास कमी आटोक्यात ठेवणारे घरगुती उपाय 

मीठाचं पाणी 

मीठाचं पाणी लो बीपीच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. मीठातील सोडियम घटक रक्तदाब सुधारायला मदत करतात. ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि प्या. अधिक मीठ आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 

बेदाणे 

बेदाणे हे नैसर्गिकरित्या गोड आणि उर्जावर्धक आहे. सुमारे 50 ग्राम चणे, 10 ग्राम बेदाणे रात्री 100 ग्राम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी चण्यांसोबत बेदाणेही चावून चावून खावे. 

व्यायाम 

हातांच्या मूठींची उघडझाप करणं, सतत  हात-पाय हलवत राहणं हे लहान सहान व्यायामप्रकार रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. 

दालचिनी 

नियमित ग्लासभर गरम पाण्यात दालचिनी पावडर मिसळून पिणं लो बीपीचा त्रास असणार्‍यांना फायदेशीर आहे. 

गाजर, पालक 

200 ग्राम गाजर, 50 ग्राम पालक यांचा एकत्र रस नियमित पिणं फायदेशीर आहे. हे पेयं लो बीपीच्या रूग्णांसाठी सुपरड्रिंक आहे. 

आवळा  

लो बीपीचा त्रास असणार्‍यांमध्ये चक्कर येण्याचा त्रास होतो. आवळ्याच्या रसात मध मिसळून पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. यासोबतच आवळ्याचा मुरांबादेखील लो बीपीच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.