मुंबई : शरीराला निरोगीला ठेवण्यासाठी किडनी हा अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. शरीरातून घातक घटक बाहेर टाकण्यासाठी किडनी निरोगी आणि मजबूत असणं आवश्यक आहे. तसेच किडनीचे विकार जडल्यानंतर त्याची लक्षणं फार स्प्ष्टपणे आढळत नसल्याने ती पूर्णपणे निकामी झाल्याशिवाय अनेकदा रूग्णांच्या लक्षात येत नाही. म्हणूनच नियमित किडनीचं आरोग्य जपण्यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
क्वॉलिफ्लॉवरमध्ये पोटॅशियम घटक, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुए किडनीचं आरोग्य जपण्यासाठी फायदा होतो. मधुमेहींमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही त्याचा फायदा होतो. यामुळे किडनीवरील ताण आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
गाजरमध्ये बीटा कॅरोटीन घटक मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांमध्ये किडनीवर उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो. हा धोका टाळण्यासाठी गाजर फायदेशीर आहे.
सफरचंदामध्ये पेक्टीन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे किडनीचं आरोग्य जपण्यासाठी फायदा होतो. केवळ किडनीसाठी नव्हे तर अनेक किडनी आजारांचा सुरूवातीच्या टप्प्यातील धोका कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर आहे.
कांद्यातील prostaglandin घटक किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताची व्हेलॉसिटी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे किडनीच्या आरोग्यासाठी कांदा फायदेशीर आहे.
लसणातील अॅन्टीऑक्सिडंट घटक दाह कमी करण्यास फायदेशीर आहेत. तसेच किडनी फेल्युअर टाळण्यासाठी, किडनीचं नुकसान टाळण्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी आहे.