मुंबई : कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते डबल मास्क कोरोनाच्या विरोधात जास्त सुरक्षित आहे. डेंन्टिस्ट मास्क लावण्यासोबतच ओरल हायजीनवर सुद्धा विशेष लक्ष देण्यास सांगत आहेत. तज्त्रांच्या मते, थोडीशी हलगर्जी दातांना खराब करू शकते.
चेन्नईचे डॉ. ए. रामचंद्रन तसेच डॉ. विनिता रामचंद्रन यांनी 'द हिंदू'शी बोलताना म्हटले की, कधी कधी जास्त वेळपर्यंत डबल मास्क वापरल्याने तोंडाला कोरड पडते. आणि डिहायड्रेशन होतं.
लोकं अनेकदा आपल्या तोंडाने श्वास घेतात. मास्क लावल्याने श्वास घेण्याची गती कमी होते. त्यामुळे त्यांच्या तोंडाला कोरड पडते. मास्क लावल्याने बऱ्याचदा लोक पाणी पिणं विसरतात. त्यामुळे तोंडात छोटे - मोठे बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे तोंडाचा वास येतो.
लोकं जेव्हा आपले तोंड बराच वेळ बंद ठेवतात, तेव्हा श्वासातून दुर्गंधी येते. लोकं आपली लाळ गिळणं विसरतात. अनेक तास ICU मध्ये असणाऱ्या लोकांमध्ये ही शक्यता जास्त असते.
मास्क लावल्याने तोंडातून दुर्गंध येतो. दात किंवा हिरडे खराब होऊ शकतात. यावर आणखी अभ्यास आणि संशोधनाची गरज आहे. मास्क लावणारे आणि मास्क न लावणारे यांच्याबाबत तुलनात्मक अध्ययन गरजेचे आहे. सध्या यावर संशोधन शक्य नाही . कारण बिना मास्कचे फिरल्याने संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.