'या' सोप्या पद्धतीने घरच्याघरी बनवा आयलाईनर!

लाईनर ही मुलींच्या दैनंदिन वापरातील गोष्ट.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 15, 2017, 01:30 PM IST
'या' सोप्या पद्धतीने घरच्याघरी बनवा आयलाईनर! title=

मुंबई : लाईनर ही मुलींच्या दैनंदिन वापरातील गोष्ट. ते लावल्याशिवाय अनेक मुली घराबाहेर पडत नाही. लाईनर लावल्याने डोळे उठावदार दिसतात. त्यांचे सौंदर्य अधिक खुलते. मग बाजारातील महागड्या लाईनरपेक्षा तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने लाईनर बनवू शकता. 

ब्लॅक आयलाईनर

साहित्य:

चारकोल पावडर कॅप्सूल - २
शुद्ध पाणी १ मोठा चमचा

कृती:

अॅक्टीव्हेटेड चारकोल कॅप्सूल उघडा आणि त्यातील पावडर एक वाटी पाण्यात मिसळा. मिश्रण नीट मिक्स करा. त्यात मध्ये मध्ये पाण्याचे थेंब घालत रहा आणि त्याची थोडी घट्टसर पेस्ट बनवा. त्यानंतर ती एका कंटेनरमध्ये काढून ब्रशच्या साहाय्याने लाईनर म्हणून लावा.

आल्मंड आयलाईनर

हे बनववे काहीसे कठीण असले तरी हे लावल्यानंतर खूप छान दिसते. 

साहित्य:

१-२ कच्चे बदाम
tweezers
मेणबत्ती
स्वच्छ नेल फिलर
शु्द्ध पाणी किंवा खोबरेल तेल

कृती:

एक कच्चे बदाम घ्या आणि मेणबत्तीवर पूर्ण काळे होईपर्यंत भाजा. 
त्यानंतर नेल फिलरने भाजल्यामुळे आलेला काळा रंग काढा. 
ती काळी साल घ्या आणि पाणी किंवा तेलात मिक्स करा. 
ते मिश्रण एका डबीत काढून ठेवा आणि गरजेनुसार वापरा. मात्र हे अधिक दिवस टिकणार नाही. म्हणून थोडे थोडे बनवा आणि वापरा. 

ब्राऊन आयलाईनर

साहित्य:

अर्धा चमचा कोको पावडर किंवा दालचिनी पावडर 
थोडं पाणी

कृती:

कोको पावडरमध्ये पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करा. त्यात गुठळी होता कामा नये, याकडे लक्ष द्या. ते एका कंनटेनरमध्ये ओतून वेळोवेळी वापरा. मात्र खूप दिवस बनवून ठेऊ नका.