मुंबई : हिरवे चणे खायला अतिशय चविष्ट असतात. पण केवळ जीभेचे चोचए पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही हिरवे चणे फायदेशीर आहेत. त्यामध्ये अनेक आरोग्यदायी घटक दडले आहेत. हिरव्या चण्यांमध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
हिरव्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात असतात. सकाळी नाश्ताला हिरव्या चणांचा आहारात समावेश केल्याने हाडं मजबूत होतात. हाडांशी निगडीत समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठीही हिरवे चणे मदत करतात. त्यामध्ये आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर '5' पदार्थ
मधुमेहींसाठीही हिरवे चणे फायदेशीर आहेत. नियमित वाटीभर हिरवे चणे खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हिरव्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स घटक मुबलक प्रमाणात असतात. नियमित हिरवे चणे खाल्ल्याने शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.
नियमित हिरव्या चण्यांचा आहारात समावेश केल्याने हृद्याचे आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते. हिरव्या चण्यांमुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण नियंत्रणात राहते.