मुंबई : उपवासाचे दिवस सुरू झाले की हमखास घराघरामध्ये साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याच्या पदार्थांपासून बनवलेले पदार्थ केवळ पोटभरीसाठी नव्हे तर आरोग्यालाही फायदेशीर आहेत. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. प्रामुख्याने गरोदर महिलांच्या आहारात साबुदाण्याच्या समावेशामुळे बाळाच्या हाडांना मजबुती मिळण्यास मदत होते.
साबुदाण्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. साबुदाण्यातील कार्बोहायड्रेट घटक गरोदरपणातील थकवा कमी करण्यास मदत करतो.
100 ग्राम सुक्या साबुदाण्यातूनही शरीराला सुमारे 355 कॅलरीज उर्जा मिळते. यामध्ये 94 ग्राम कार्बोहायड्रेट्स आढळतात. गरोदरपणात वजन कमी असणार्यांमध्ये साबुदाण्याचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे जन्माच्या वेळेस बाळाचं वजन योग्य राहण्यास मदत होते.
गरोदरपणाच्या काळात महिलांना संतुलित आहार घेणं आवश्यक असते. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात.यामुळे हाडं मजबुत होतात.
साबुदाण्यात फॉळिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. सोबतच व्हिटॅमिन बी मुबलक असते. यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते. बाळाच्या गर्भातील विकासासाठी आवश्यक घटक मिळतात.
साबुदाण्यामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामधील पोटॅशियम घटक रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबाचा, हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.