मुंबई : शरीराच्या चुकीच्या आसनामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा आपण चुकीच्या पद्धतीनं बसतो आणि त्यामुळेच या समस्या होतात. या सगळ्या समस्या दूर करायच्या असतील तर योगा करा. जास्त वेळ खुर्चीवर बसून किंवा मग झोपून राहणं, लॅपटॉप, कॉम्प्युटवर काम करत राहिल्यानं अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (bad body posture) या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहे. खराब बॉडी पोजीशनमुळे आरोग्य समस्या होऊ शकतात. (yoga) जर तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल तर रोजच्या जीवनात योगासन जरूर करा. (health news)
मार्जरी आसन (cat pose) : या आसनाची स्थिती मांजरीसारखी असते, म्हणून याला मार्जरी आसन असे म्हणतात. या आसनामुळे पाठीचे हाड मजबूत होते.
माउंटन पोझ (Tadasana) : माउंटन पोझ किंवा ताडासन करणे खूप सोपे आहे. यामुळे शरीर सरळ राहते आणि तुमचे खांदे, छाती आणि हात देखील मजबूत होतात.
प्लैंक (Plank) : शरीराची स्थिती सुधारण्यासाठी प्लैंक हा देखील एक चांगला पर्याय आहे. प्लँक तुमचे मुख्य स्नायू आणि मणका मजबूत करण्याचे काम करते.
अधोमुख श्वानासन (Adho mukha svanasana) : हे आसन केल्यानं बॉडी पोश्चर सुधारतं. यामुळे तुमच्या शरीरातील हाडंदेखील मजबूत होतात आणि शरीरातील रक्तप्रवाहही चांगला होतो. (health News these yoga poses will help you in improvising your body posture)
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)