मुंबई : लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. बदलत्या हवामानचा लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि लोकांना होणाऱ्या एलर्जीची समस्या वाढते. त्याच वेळी, शरीरात असलेल्या विषारी पदार्थांमुळे रोग आणि विषाणूंना सहज होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, शरीरात असलेले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि घरी वापरल्या जाणार्या साध्या पण नैसर्गिक गोष्टींपासून चहा तयार करून तुम्ही शरीर डिटॉक्स करू शकता. यामुळे शरीर आतून आणि बाहेरून निरोगी राहते आणि रोगांचा धोका कमी होतो. चला तर अशाच काही हर्बल डिटॉक्स ड्रिंक्सचे रेसिपी जाणून घेऊया
दालचिनी चहा
हिवाळ्यात गरम मसाल्यांचे सेवन शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याचे काम करते आणि यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरम मसाल्यांचे सेवन केले जाऊ शकते. असाच एक गरम मसाला म्हणजे दालचिनी. घरी सहज मिळणारा हा मसाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतो आणि शरीरात जमा होणारे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करतो. दालचिनीचा हर्बल चहा प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब पातळी संतुलित राहते.
दालचिनी चहा कसा बनवायचा
एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा. या पाण्यात दालचिनीचे 2 तुकडे घाला आणि हे पाणी 10 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर हे गरम पाणी गाळून प्या.
आले-हळद चहा
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने घसा खवखवणे, सर्दी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे, हळद त्याच्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट-सदृश घटकांमुळे लोकांचे आरोग्य सुधारते. ही दोन औषधी वनस्पती एकत्र उकळून हर्बल चहा बनवा. हा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर आतून स्वच्छ होते आणि रोगांचा धोका कमी होतो.
कसा बनवाल आले- हळद चहा
कच्च्या हळदीची पेस्ट आणि आल्याची पेस्ट समान प्रमाणात एक ग्लास पाण्यात मिसळा आणि उकळण्यासाठी ठेवा. हे पाणी 8-10 मिनिटे उकळल्यानंतर ते आचेवरून उतरवा. आता या मिश्रणात चवीनुसार मध घालून गाळून घ्या. नंतर, ते गरम असताना हळूहळू प्या.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)