Health Tips In Marathi: भाजी कमी पडली किंवा भाजीत बटाटे घालून ती वाढवता येते किंवा अगदी पटकन होणारी भाजी म्हणजे बटाटा. जेवणाव्यतिरिक्त आता फास्ट फुड किंवा इतर पदार्थांतही बटाट्याचा वापर केला जातो. लहानांपासून मोठेही आवडीने बटाटा खातात. मात्र अतिप्रमाणात बटाटे खाण्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. कारण प्रमाणाबाहेर बटाटा खाणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. त्याचबरोबर वजन देखील वाढू शकते. बटाटा जास्त प्रमाणात खाण्याचे काय आहेत दुष्परिणाम जाणून घेऊयात.
जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर बटाटे खाणे टाळले पाहिजे. विशेष म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनीदेखील बटाटे अतिप्रमाणात खाणे टाळावेत. तसंच, जे लोकं डिप फ्राय करुन बटाटे खातात त्यांच्या आरोग्यासाठी हे घातक ठरु शकते. बटाटे जास्तप्रमाणात खाल्ल्याने काय काय होऊ शकते हे जाणून घेऊया.
बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटातील गॅस वाढू शकतो. अतिप्रमाणात बटाटे खाणे हे गॅस वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. गॅसच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी बटाटे खाणे टाळावे. जेवणात कमी प्रमाणातच बटाटे वापरावेत तसंच फास्ट फुडमध्ये असलेले बटाट्याचे पदार्थही टाळावेत. रोज बटाटे खाल्ल्याने फॅटदेखील वाढते.
बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत वाढणारे वजन नियंत्रणात आणायटे असेल तर बटाटे खाणे बंद करावे लागेल. बटाटे खाल्ल्याने कॅलरीजदेखील वाढतात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर बटाटे खाणे टाळावे. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित असेल तर बटाटे खाणे टाळावे.
बटाटे खाल्ल्याने बीपी वाढते. संशोधनानुसार, आठवड्यातून चार किंवा अधिक वेळा भाजलेले, उकडलेले किंवा मॅश केलेले बटाटे खाऊ नयेत. त्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. रक्तदाब टाळण्यासाठी बटाटे खाणे पूर्णपणे बंद करणे देखील आवश्यक नाही. पण प्रमाणाबाहेर खाऊ नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)