मुंबई : वजन कमी असणार्यांसाठी नेहमीच ते आरोग्यदायी पद्धतीने वाढवणं हे एक आव्हान असते.
अनेकदा शाकाहार्यांसाठी हे आव्हान मोठं असतं. कारण वजन वाधवायचं म्हणजे अंड खा हा सल्ला सरळ दिला जातो. पण केवळ शाकाहारी पदार्थ खाऊन वजन वाढवण्यासाठी देखील काही पर्याय उपलब्ध आहेत. हे अनेकांना ठाऊक नाही.
पहा आरोग्यदायी पद्धतीने वजन वाढवण्याचा शाकाहारी पर्याय
दूधामध्ये प्रोटीन मुबलक असते. त्यामुळे मसल्स वाढायला मदत होते. त्याउळे दूधासोबत खजूर किंवा केळं हा उत्तम पर्याय आहे. नुसतं दूध पिणं आवडत नसेल तर खजूराचा, केळ्याचा मिल्कशेक नक्की प्यावा,
लाल तांदूळ किंवा नेहमीचा तांदूळ आहारात भाताप्र्माणेच इतर अन्नपदार्थांमध्ये समाविष्ट करून खाऊ शकता. यामुळे आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण सुधारते. शरीरात चांगल्या स्वरूपात कॅलरीज वाढतात. भाताप्रमाणेच खीरीच्या स्वरूपातही तांदळाचा समावेश वाढवू शकता.
आहारात सुकामेवा अवेळी लागणार्या भूकेच्या वेळेस अवश्य खावा. यामुळे शरीरात हेल्दी फॅट्स आणि कॅलरीज वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरूवात बदाम खाऊन करावी.
बटाटा, रताळं, कॉर्न, बिन्स, डाळी असे स्टार्चयुक्त पदार्थ आहारात घ्यावे. यामुळे शरीरात प्रोटीन, कॅलरीज यांचे प्रमाण सुधारते.
सुकवलेले मनुका, अंजीर हे शरीराला पोषक आहेत. तसेच अवेळीलागणार्या भूकेवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
ओट्समुळेदेखील वजन वाढते. मात्र यामध्ये मध, ड्राय फ्रुट्स, दही यांचा समावेश वाढवा