Right Way To Test BP : बदलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे रक्तदाबाची समस्या सासत्याने वाढत आहेत. महिला असो वा पुरुष किंवा तरुण असो वा ज्येष्ठ नागरिक उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाची समस्या यांच्यामध्ये दिसून येत आहे. अगदी बीपीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे घरामध्ये बीपी तपासण्यासाठी डिजिटल ब्लड प्रेशर मशीन असते. अशावेळी बीपी हे झोपून किंवा पलंगावर बसून नेमकं कसं तपासायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल. बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दल नवी दिल्ली सर गंगा राम हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांनी बीपी तपासण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. (How to check blood pressure lying or sitting Learn the correct method of measuring BP from doctor)
डॉ. सोनिया रावत सांगता की, प्रौढांचा सामान्य रक्तदाब 120/80 मिमी एचजी एवढा असतो. त्या म्हणाल्या की, सिस्टोलिक दाब 120 मिमी एचजीपर्यंत आणि डायस्टोलिक दाब 80 मिमी एचजीपर्यंत असायला हवा. यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास त्या व्यक्तीला उच्च आणि कमी रक्तदाबाची समस्या असते. बीपीचा त्रास असल्याना सतत तो तपासत राहावा लागतो. त्यात कमी जास्त प्रमाण झाल्यास डॉक्टरांचा संपर्क करावा.
डॉक्टर सोनिया रावत यांनी बीपी तपासण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्या म्हणतात की, बीपी तपासताना आरामात खुर्चीवर बसणे ही योग्य पद्धत आहे. खुर्चीवर बसताना तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत आणि तुमचे हात तुमच्या समोरच्या टेबलावर हृदयाच्या उंचीएवढे असावी ही बीपी तपासण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही उजव्या किंवा डाव्या हाताने बीपी चेक करु शकता. काही वेळ या स्थितीत बसल्यानंतर थोडा वेळाने तुम्ही बीपी चेक करु शकता. या पद्धतीचा वापर केल्यास तुम्हाला बीपीचं अचूक रीडिंग मिळतं. विशेष ज्या लोकांना चक्कर येत आहे, त्यांचं बीपी हे झोपून तपासल्यास हरकत नाही.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही झोपून तुमचा रक्तदाब तपासला तर तुम्हाला बसण्याच्या तुलनेत थोडे कमी रीडिंग प्राप्त होते. त्यामुळे योग्य रीडिंगसाठी लोकांनी खुर्चीवर बसून बीपी तपासावा. जर एखाद्या व्यक्तीची स्थिती चुकीची असेल तर, बीपी रीडिंगमध्ये थोडासा बदल तुम्हाला दिसून येईल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)