मुंबई : प्रत्येकाला हे माहित आहे की, केळे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की, जर तुम्ही काळजी न घेता केळी खरेदी केली तर अशा केळीमुळे तुम्ही आजारी पडू शकता. आजकाल केळी लवकर पिकण्यासाठी अनेक शॉर्टकट अवलंबले जातात आणि केळी कार्बाइडने पिकवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, कार्बाइडने पिकवलेली केळी कशी ओळखायची तुम्हाला माहित आहे? तसेच ही केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते याबद्दल तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत.
खरेतर नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळ्यांना हलके तपकिरी आणि काळ्या रंगाचे डाग असतात आणि ते चवीला गोड असतात. अशा केळींची त्वचा गडद पिवळी आणि डागलेली असते. परंतु कार्बाईड किंवा केमिकल इत्यादींनी पिकवलेली केळी ही प्लेन आणि हलक्या पिवळ्या रंगाची असतात. तसेच, केळींचे शेवटचे टोक हे काळ्याऐवजी हिरव्या रंगाचे असतात, तसेच अशी केळी लवकर खराब होतात.
नैसर्गिकरित्या पिकलेली केळी गोड असतात आणि तुम्ही ती काही दिवस वापरू शकता. परंतु रासायनिक किंवा केमिकल पद्धतीने पिकवलेली केळी ही खूप मऊ असताता, ती जास्त दिवस टिकत नाही. तसेच ही केळी काही ठिकाणी जास्त पिकलेली तर काही ठिकाणी कच्ची असतात.
यासह, बरेच लोक केळींना पाण्यात ठेवून त्याची ओळख करतात. असे म्हटले जाते की, जी केळी पाण्यात किंचित बुडतात ते नैसर्गिक पणे पिकलेली केळे असतात, तर पाण्यावर तरंगणारे फळ हे खोटे किंवा रासायनिकपद्धतीने पिकवलेले असतात.
अनेक फळांसाठी असे म्हटले जाते की, जर तुम्ही कार्बाईडसह पिकलेली फळे जास्त काळ खाल्ली तर तुम्हाला कर्करोगाचा धोका उद्धभवू शकतो. यासह, यकृतापासून शरीराच्या अनेक भागांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ही केळी केवळ आपल्या पोटावर परिणाम करत नाही, तर लोक यामुळे उलट्या किंवा इतर आजारांची तक्रार करतात.