Nirmalya Skin And Beauty Benefits : गणेशोत्सवाचं मंगल आणि उत्सवाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या फुलांनी मंडप, घरचे बाप्पा सजले आहेत. सगळीकडे सुंगधी फुलांच्या माळांनी उत्साहाचं वातावरण आहे. काही घरांमधून बाप्पाने निरोप घेतलाय पण अनेक जणांकडे किंवा अगदी मंडपामध्ये बाप्पा विराजमान आहे. दररोज अगदी मोठ्या प्रमाणात फुलांची रास बाप्पाच्या चरणावर पडत आहे. असं असताना या निर्माल्याचं पुढे काय करायचं? हा प्रश्न पडत आहे. निर्माल्यापासून खत तर तयार होतेच पण यासोबतच निर्माल्य तुमचा चेहरा ग्लो करायला देखील मदत करतो. फक्त हे निर्माल्य कसं वापरायचं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
गणपत्ती बाप्पाची मनोभावे पूजा करताना आपण अनेक सुगंधी फुले अर्पण करतो. एवढेच नव्हे तर बाप्पाचा लाडका दुर्वा हा देखील असतो. तसेच शुभ मानले जाणारे आंब्याचे पान या सगळ्या गोष्टी तुमच्या त्वचेचा उजळपणा वाढण्यासाठी मदत करेल. एवढंच नव्हे तर बाप्पाच्या आवडीचे फुलं जास्वंद देखील घनदाट केस बनवण्यास मदत करते. फक्त हे कसे वापरावे आणि त्याचे सौंदर्यासाठी कसे वापरता येईल हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
दुर्वाचे सेवन केल्यास शरीरातील रक्त शुध्द होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर रेड ब्लड सेल्स वाढण्यासही मदत होते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अनोखा ग्लो पाहायला मिळतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहते. दुर्वा वाटून चेहऱ्यावर लावल्यावर काळे डाग, मुरूम आणि स्कीनचे इतर आजार दूर होण्यास मदत होते.
NCBI च्या रिपोर्टनुसार, केस गळणे किंवा टक्कल झाल्याच्या समस्यांना सामोरे जात आहात. अशावेळी बाप्पाच्या चरणी अर्पण केली जाणारे जास्वंदीची फुले तुम्हाला नक्कीच मदत करतील. केसांचा पोत उत्तम करण्यासाठी तसेच टक्कल पडत असल्यास केस गळती टाळण्यासाठी जास्वंद मदत करेल. एवढंच नव्हे तर चेहऱ्यावर जास्वंदीचा मास्क लावून चेहऱ्याचा ग्लो अधिक वाढवू शकाल.
बाप्पाची आरास करायला गुलाबाचा वापर करताय. मग ही गुलाबं किती गुणकारी आहेत ते जाणून घ्या. गुलांबाचा फेस मास्क, गुलाबपाणी एवढंच नव्हे तर चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी तुम्ही नाईट क्रिम देखील वापरू शकता. गुलाबामुळे तुमचा चेहरा कायम हायड्रेड राहतो. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण गुलाबामुळे होते.
Healthline च्या रिपोर्टनुसार, आंब्याची पाने प्रत्येक शुभ कार्यात अगदी अग्रस्थानी असतात. केसगळती थांबवण्यासाठी आंबा नक्कीच गुणकारी ठरतो. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळते यामुळे घनदाट केस होण्यास मजत होईल. केसांची चमक वाढवण्यासाठी व पोत उत्तम करण्यासाठी बाप्पाच्या निर्माल्यातील आंब्याची पाने नक्कीच वापरू शकता. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फ्लेव्होनॉइड्स असल्यामुळे केस पांढरे होण्यापासून रोखले जाते.
निर्माल्य वापरताना सुरूवातीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. तसे की, निर्माल्याचे वर्गीकरण करावे. तसेच ते प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता टोपल्यांमध्ये ठेवावे. निर्माल्य कुझू न देता त्याचा योग्य तो वापर करावा. रोजच्या रोज निर्माल्य वापरल्यास सौंदर्यातील तजेलदारपणा तुम्ही अनुभवू शकता.