मुंबई : पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पण सध्या या पावसाळ्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. विशेषतः पावसाळा आणि कोरोना विषाणू यांचा थेट संबंध नाही. परंतु, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने कॉलरा, जुलाब, काविळ असे आजार वाढतात. याशिवाय डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टो यांसारख्या आजारांच्या रूग्णसंख्येतही वाढ झालेली पाहायला मिळत असल्याचे ग्लोबल रूग्णालयाचे गॅस्ट्रोन्टेरोलॉजिस्ट डॉ. गौरव पाटील सांगतात
दरवर्षी पावसाळ्यात सर्व रूग्णालयात रूग्णांची उपचारासाठी रांगाच रांग लागलेली असते. परंतु, यंदाच्या वर्षी बहुतांश रूग्णालये कोविड-१९ रूग्णांसाठी देण्यात आली आहेत. यामुळे सर्वसाधारण आजारांची लक्षणे असलेल्या रूग्णांना दाखल करण्याऐवजी घरीच उपचार दिले जात आहेत. म्हणूनच पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजारांपासन वाचण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे.
अनेकदा असे लक्षात आले आहे की, शहरातील गर्दीची ठिकाणं, असुरक्षित खाद्यपदार्थ आणि दुषित पाण्याचे सेवन, फळे-भाज्या स्वच्छ धुवून न घेणे आणि रस्त्यावरील पदार्थांचे सेवन करणे या सवयींमुळे पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचा धोका सर्वांधिक आहे.
पोटदुखी, मळमळ व उलट्या होणं असा त्रास जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच उपचार न झाल्यास डिहायड्रेशनचा धोका उद्भवू शकतो.
दुषित अन्न किंवा पाण्याद्वारे अनेक विषाणूं शरीरात प्रवेश करतात. यामुळे ताप, आतड्यांना सूज येणं, शौचातून रक्त पडणे असा समस्या उद्भवतात. असा रूग्णांना रूग्णालयात दाखल करणं गरजेचं असतं.
संसर्गजन्य आजारापासून स्वतः बचाव कसा करालं
दररोज उकललेले पाणी प्या
कच्च्या भाज्या न खाता चांगल्या शिजवून घ्या
शिळे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळावेत.
वैयक्तिक स्वच्छतेसह अन्नपदार्थ व घरातील भांडीही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून संक्रमणाचा धोका टाळता येऊ शकतो.
तेलकट, तिखटर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ खाऊ नयेत, ज्यामुळे आतड्यांना इजा होईल.
आहारात दहीचा वापर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार घेणं शक्यतो टाळा. यामुळे आरोग्याला धोका संभवू शकतो.
ताप, उलट्या किंवा शौचातून रक्त जाणे हा त्रास अधिक दिवस राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारांचा सर्वांधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असतो. या काळावधीत त्यांच्या आऱोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असते. ही लोकं पौष्टिक आहाराचे सेवन करतात का आणि तासभराने पाणी पितात का हे पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच प्रकरणात अशा रूग्णांमध्ये आतड्यांसंबंधी विकार उद्भवतात. अशावेळी वेळीच लक्षणं ओळखून डॉक्टरांशी याबाबत चर्चा करणे गरजेचं आहे.