बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा सिनेमा दरम्यान एक अपघात झाला होता. मिस्टर ऍण्ड मिसेस माही सिनेमाच्या शुटिंग दरम्यान खांद्याला दुखापत झाली. यामुळे तिला मल्टी डायरेक्शन इंस्टाबिलिटीचा त्रास झाला होता. या आजारपणामुळे जान्हवीला अक्षरशः पुस्तकाचे पान हलवणे देखील कठीण झाले होते. एका मुलाखती दरम्यान सांगितले की, जान्हवीला MDI चा त्रास झाला. खांद्यापासून मल्टीपल टोर्न लिगामेंट्सची समस्या निर्माण झाली.
मल्टी डायरेक्शनल इंस्टाबिलिटीचा त्रास हा खांद्यावर परिणाम करणारा एक प्रकारचा त्रास आहे. दुखापत आहे. या स्थितीत खांदे पुढे वाकू लागतात. जेव्हा लिगामेंट्स कमकुवत होऊ लागतात तेव्हा खांदे खालच्या दिशेने वाकू लागतात. अनेक वेळा खांदा इतका वाकतो की तो शरीरापासून वेगळा दिसतो. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखाद्याला विजेचा झटका दिला जातो किंवा त्याला अपस्माराचे झटके येतात तेव्हा ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, खांद्याचे सॉकेट सैल होऊ लागतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)