Onion Kitchen Hacks In Marathi: स्वयंपाक करताना सर्वात कंटाळवाणे आणि किचकट काम म्हणजे कांदा चिरणे. कांदा (Onion Cut) चिरताना डोळ्यांची जळजळ होते व कधीकधी घळाघळा डोळ्यातून पाणी येते. त्यामुळं स्वयंपाक करण्याचा सगळा मूडच जातो. पण कांदा हा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. भाजी असो किंवा रायते, सगळ्यांत कांदाहा हवाच. पण आज आम्ही तुमचं एक कंटाळवाणे काम हलके करणार आहोत. कांदा कापताना डोळ्यातून येणारे पाणी थांबवण्यासाठी या काही टिप्स वापरुन पाहा. (Kitchen Tips In Marathi)
कांद्यात एक प्रकारजे एंजाइम असते. त्यामुळं कांदा कापताना डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. कांदा चिरत असताना एन्झाइमचा हवेशी संपर्क होतो आणि ते पसरु लागतात. त्याच्या उग्र दर्पाने डोळ्यातून पाणी येते. जेव्हा आपण कांदा धुवून किंवा थंड करुन चिरतो तेव्हा पाण्याच्या अंशाने एन्झाइम निघून गेलेले असतात. त्यामुळं त्रास कमी होतो. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
कांदा वरच्या बाजूला कापल्यानंतर त्याच्यातील एंझाइम्सचा डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळं डोळ्यातून पाणी येते. त्यामुळं कांदा नेहमी मुळापासून कापावा त्यामुळं एंझाइमचा प्रभाव कमी होतो.
कांदा कापताना तुम्ही लिंबाचा वापरही करु शकता. कांदा कापण्यापूर्वी चाकूवर थोडा लिंबाचा रस लावावा. त्यामुळं कांद्यातील एन्झाइमचा डोळ्यांवर परिणाम होणार नाही आणि जळजळही कमी होईल.
कांद्यातील एन्झाइममुळं डोळे जळजळतात ही जळजळ थांबवण्यासाठी कांदा कापण्यापूर्वी व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवावा.
कांदा कापण्यापूर्वी कांदे सोलून काही वेळ फ्रिजरमध्ये ठेवा. त्यामुळं कांद्यातील एन्झाइमचा प्रभावही कमी होईल आणि कांदा कापताना डोळ्यातून पाणीही कमी येईल.
कांदा कापत असताना तुमच्या आजूबाजूला मेणबत्ती किंवा दिवा लावावा. कांद्यातील बाहेर पडणारे एन्झाइम उष्णतेकडे वळते आणि त्याचा डोळ्यांवर परिणाम होत नाही.
कांदा कापताना नळाच्या पाण्याखाली धरुन ठेवावा. त्यामुळं कांदा कापताना डोळे चुरचुरणार नाहीत.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)