मेथीच्या दाण्यांचा ब्रेकफास्टमध्ये करा असा उपयोग; 8 आजारांवर मात करण्याचा सद्गुरूंचा फंडा

Sadhaguru Health Tips: सद्गुरूंना आपण सर्वच जण फॉलो करतो. ते आपल्याला अनेक सल्ले आणि माहिती देत असतात जी आपल्या जीवनासाठी फार उपयुक्त असते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की यावेळी त्यांनी आरोग्यानिमित्त काय टीप्स दिल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 7, 2023, 10:13 AM IST
मेथीच्या दाण्यांचा ब्रेकफास्टमध्ये करा असा उपयोग; 8 आजारांवर मात करण्याचा सद्गुरूंचा फंडा title=
August 6, 2023 | what are the benefits of methi seeds in breafast sadhaguru explains

Sadhaguru Health Tips: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातून सध्या फार मोठ्या प्रमाणात विविध आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. अशाच आता आपल्याला आपल्या आहारात योग्य त्या गोष्टींंचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. नाश्ता आपल्या पौष्टिक आणि पोटभर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून आपला नाश्ता जर का नीट झाला नाही तर दिवसभर आपल्याला भुक सतावते आणि मग त्यामुळे दिवसही फार खराब जाऊ शकतो. त्यातून योग्य वेळी जेवलो नाही तर आपल्यालाही विविध आजारांचाही सामना करावा लागतो. परंतु हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात योग्य त्या गोष्टींचा समावेश करणं फार जास्त आवश्यक आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया यावेळी यासाठी सद्गुरूंनी आपल्याला कोणत्या टीप्स दिलेल्या आहेत. 

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पालेभाज्या आणि कडधान्य खाण्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. त्यातून मेथीचेही आपल्यासाठी अनेक फायदे आहेत. आपल्या नाश्त्यात आपण मेथीचा वापर करून घेऊ शकतो ज्यामुळे आपण 8 आजारांपासून लांब राहू शकतो. सध्या सद्गुरूंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात त्यांनी मेथी आणि मेथीचे फायदे यांच्याविषयी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी नाश्त्यात आपण मेथीचा उपयोग कसा करून घेऊ शकतो याबद्दल सांगितले आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यावेळी त्यांनी दिलेली माहिती कोणती? कदाचित ती ऐकल्यावर तुम्हालाही ही माहिती ठाऊक नसेल.

हेही वाचा - आलियानं एकाच आठवड्यात केलं दोनदा लग्न? करण जोहरनं सांगितलं खरं काय ते...

अशुद्ध रक्त, प्रोटीनची कमतरता, व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता, ब्रेस्टफिडिंगसाठी कमतरता, केस आणि नख न वाढण्याची चिंता, इंफ्लामेशन, हाय बल्ड शुगर आणि ब्लड प्रेशर अशा आजारांपासून मेथी आपले संरक्षण करते. तेव्हा जाणून घेऊया की याचे फायदे काय आहेत. मेथीच्या दाण्यातून प्रोटीन, फायबर, कार्ब्स, आयरन, मॅगनीज, मॅगनेशियम असे पोषक घटक असतात. त्यामुळे आपल्यासाठी मेथीचे पदार्थ खाणं हे फारच गरजेचे आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सद्गुरूंनी या व्हिडीओत सांगितले की, मोड आलेले मेथीच्या दाण्यांचा आपल्या नाश्यात समावेश करून घ्यावा. त्यातून वयाच्या 50 व्या वयानंतर मेथीचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे त्याचसोबत मेथीचे दाणे हे भिजवून खाल्ल्यानं ते फायदेशीर ठरतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)