Heart Failure च्या सुरुवातीला मिळतात हे संकेत, या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Heart Failure : आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर धोका वाढ शकतो. हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतली पाहिजेच. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा ते तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनशैलीच्या सवयी याही कारणीभूत आहेत.

Updated: Mar 31, 2023, 12:35 PM IST
Heart Failure च्या सुरुवातीला मिळतात हे संकेत, या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष title=

Heart Failure : हार्ट फेल होण्यामागे तुमची खराब जीवनशैलीच्या सवयी आहेत. यात तुमच्या आहारापासून काही सवयींचा भाग आहे. जास्त मद्यपान, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढलेला ताण हृदयरोगास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.

 हृदयरोग ही जगात एक सार्वजनिक आरोग्य समस्या होत आहे. जवळपास 6.4 कोटी लोकांना  हृदयरोगाचा आजार जडला आहे. याचे निदान होत असल्याने, तरीही भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी 1 टक्क्यांपेक्षा जास्त लोक या समस्येने प्रभावित आहेत. अनेक अभ्यासांनी असे सूचित केले आहे की आपल्या देशात हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. देशात दरवर्षी 18 लाखांहून अधिक लोक रुग्णालयात दाखल होतात. 

आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर धोका वाढ शकतो. हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतली पाहिजेच. तुमचा आहार कसा आहे, यावरही बरेचसे अवलंबून आहे. जास्त मद्यपान करणे, धूम्रपान करणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढलेला ताण हृदयविकार वाढवतो.

Heart Failure ही एक गंभीर समस्या होत आहे. ज्यामध्ये हृदयाचे अवयव कमकुवत होत असतात.  हृदय त्याचे सामान्य काम करु शकत नाही. दीर्घकाळापर्यंत कोणताही अनुवांशिक रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, काही धोकादायक औषधांचा वापर, न्यूरोलॉजिकल रोग इत्यादींसारख्या हृदयविकाराची अनेक कारणे असू शकतात.

Heart Failure च्या चिन्हात सुरुवातीला रुग्णांमध्ये थकवा जाणवणे, फुफ्फुसाचा श्वासोच्छवास, छातीत दुखणे, ओटीपोटात अस्वस्थता आणि घाम येणे यासारखी सुरुवातीची लक्षणे असू शकतात. हा आजार वेळीच ओळखला नाही तर तो जीवघेणाही ठरु शकतो. हृदयरोगचा विचार करताना व्यक्तीचे वय, स्थिती आणि संसर्गामुळे हृदयविकाराची लक्षणे बदलू शकतात.  

थकवा - हे एक सामान्य लक्षण आहे. असंतुलित हृदयाच्या कार्यामुळे, शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात ज्यामुळे थकवा येतो आणि अनेकदा श्रम केल्यानंतरही अस्वस्थता जाणवते.

श्वास लागणे - हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असतो. यामध्ये बहुतांश रुग्णांना रात्री झोपताना जास्त अस्वस्थत होते. हे लक्षण दिसले तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा. हे गंभीर स्थितीचे लक्षण असू शकते.

खालच्या भागात सूज येणे - हृदयविकाराच्या रुग्णांना खालच्या भागात सूज येणे सामान्य आहे. ही सूज एका अंग किंवा पायापुरती मर्यादित नसून संपूर्ण शरीरात दिसून येते.

पोटाच्या समस्या - Heart Failureमुळे रुग्णांना पोटाचा त्रास जाणवतो. या समस्यांमध्ये ओटीपोटात गॅश होतो, उलट्या होणे किंवा पोटदुखीचा समावेश असू शकतो.

छातीत दुखणे - हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांना अनेकदा छातीत दुखण्याची समस्या जाणवते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)