Mental Health News : तुम्ही तुमच्या नोकरीच्या (Job News) ठिकाणी आनंदात आहात का? असा प्रश्न विचारला असता तुमचं उत्तर काय असेल? हो, नाही, हो आणि नाही... किंवा इतर काही. उत्तर काहीही द्या, पण एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल कारण, यामध्ये तुमच्या मनातच्या उत्तरांच्या आधारेच आकडेवारी मांडण्यात आली आहे. अहवाल थोडक्यात स्पष्ट करायचा झाल्यास जगभरातील 60 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यावर नोकरीचा परिणाम होतो असं वाटतं. (Managers boss and work life culture have negative impact on mental health than spouses and doctors claims report)
निरीक्षणात सहभागी झालेल्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी आणि पगार कपात याची तमा न बाळगता (Mental Health) मानसिक आरोग्याला प्राधान्यस्थानी ठेवणाऱ्यांचीची संख्या जास्त आहे.
UKG मधील The Workforce Institute नं 'Mental Health at Work: Managers and Money' हा अहवाल नुकताच सादर केला. ज्यातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जोडीदारामुळं त्रास होत नाही, इतकं टेन्शन Boss नोकरीच्या ठिकाणी वाढवतो. जोडीदार, डॉक्टर आणि थेरपिस्टच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर बॉसचा जास्त परिणाम होतो. इतकंच नव्हे, तर जागतिक स्तरावर नोकरीवरील तणावामुळं (Work related stress and depression ) पुढील 12 महिन्यांत साधारण 40 टक्के नोकरदार वर्ग नोकरीला रामराम ठोकू शकतो.
नोकरीतून हाती लागतेय नकारात्मकता...
जगभरातील 10 देशांमधील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या निरीक्षणानुसार दर पाचपैकी एका कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीतूनच जीननात नकारात्मकता येत असल्याचं म्हटलं आहे. कामाचा दिवस संपताना 43 टक्के नोकरदार वर्गाला कधीतरी किंवा नेहमीच थकल्यासारखं वाटतं. 78 टक्के नोकरदार वर्गाच्या मते कामाच्या ठिकाणी असणारा तणाव त्यांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो. तर, नोकरीतील नकारात्मकता घरापर्यंत पोहोचते असं 71 टक्के कर्मचारी वर्गाचं मत.
लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे 40 टक्के कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत त्यांच्या बॉसशी संवादही साधलेला नाही. किंवा अगदी क्वचितच बोलणं झालं आहे. काहींच्या मते त्यांच्या वरिष्ठांना काहीच फरक पडत नाही. तर, 13 टक्के नोकरदारांच्या मते त्यांचा बॉस सतत व्यग्र असतो. इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तणावात असणाऱ्यांमध्ये या Boss मंडळींचाही समावेश आहे. किंबहुना हीच मंडळी येत्या काळात कंपन्यांची साथही सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात.
नोकरी, नोकरीचे तास, टार्गेट ही अशीच भाषा आपण तासनतास बोलत असतो. एकमेकांची साथ देण्याची संकल्पना आता मागे पडली असून, त्याची जागा एकमेकांची कुरघोडी करण्याच्या वृत्तीनं घेतली आहे. चांगल्या कामापेक्षा आपल्याला कौल देणाऱ्यांना अनेक ठिकाणी प्राधान्य मिळत आहे. नोकरीच्या ठिकाणी असणारा दुजाभाव अधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे. या साऱ्यामध्ये मेहनत आणि चिकाटीनं काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे. या साऱ्याचे परिणाम म्हणजेच हे ढासळलेलं मासिक आरोग्य.... नाही का?