मुंबई : रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय नेहमी चांगली. अनेक जण सकाळी उठल्यावर कोमट पाणी घेतात, अनेक मेडिटेशन करतात, काहीजण व्यायाम तर अनेकांचा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम असतो. या सवयींमुळे आपले आरोग्य चांगले राहते. मात्र काहींना अशा काही सवयी असतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
सकाळ प्रसन्न असेल तर दिवसभर प्रसन्नता कायम राहते. त्यामुळे सकाळी उठून अशी कोणतीही कामं करु नका ज्यामुळे तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल. याचा शरीरारवरही मोठा परिणाम होतो.
अनेकांना सकाळी जाग आल्यानंतक बेडवर अथवा इथे तिथे पडून राहण्याची सवय असते. यामुळे शरीरात अधिक आळस निर्माण होतो.
सकाळचे वातावरण नेहमी प्रसन्नता वाढवणारं असलं पाहिजे. त्यामुळे उठल्यानंतर कोणाशी वाद घालू नका. यामुळे दिवसभर तुमचा मू़ड खराब राहील.
सकाळच्या वेळेस नाश्ता घेताना अधिक मसालेदार खाणं टाळा. हलका आणि पौष्टिक आहार घेणं गरजेचं.
अनेकांना सकाळी उठल्यावर कॉफी पिण्याची सवय असते. मात्र तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, सकाळी कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोल या हार्मोनचे प्रमाण वाढतं.