सनग्लास बाबत तुमच्याही मनात हे '7' गैरसमज आहेत का?

उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी सनग्लास वापरणं अत्यावश्यक आहे.

Updated: May 15, 2018, 05:43 PM IST
सनग्लास बाबत तुमच्याही मनात हे '7' गैरसमज आहेत का?  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी सनग्लास वापरणं अत्यावश्यक आहे. केवळ फॅशन सेगमेंट म्हणून नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी सनग्लास नक्की वापरा. मात्र सनग्लासची निवड करताना काही चूका केल्यास त्याचा डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमच्याही मनात सनग्लासबाबत हे काही समज - गैर समज असल्यास त्यांना ताबडतोब दूर करणं आवश्यक आहे. 

 
 दूर करा सनग्लास बाबतचे हे गैरसमज - 

 
 1) महागडे, ब्रॅन्डेड सनग्लास म्हणजे उत्तम 
 
 सनग्लास घेताना त्याचा ब्रॅन्ड नक्की बघा. पण त्यासोबतच युव्ही रे पासून प्रोटेशन करण्यास समर्थ आहेत का ? हे देखील नक्की तपासून पहा. 
 
 2) डोळे झाकले जाणं पुरेसे आहे 
 
 डोळे झाकले म्हणजे सूर्यकिरणांपासून डोळ्यांचा बचाव झाला असे समजू नका. सनस्लास जितके मोठे असतील तितके ते फायदेशीर आहेत. छोट्या फ्रेमच्या सनग्लासमुळे बाजूने युव्ही रे डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. 
 
 3) लहान - मोठे स्क्रॅचेस फारसे त्रासदायक नाहीत 
 
 स्क्रॅचेसमधून पाहिल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांवर दाबाव येऊ शकतो. 
 
 4) सनग्लासचा गडद रंग फायदेशीर - 
 
 सनग्लासेसच्या रंगांचा डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. 
 
 5) जुने सनग्लास घालू नयेत - 
 
 सनग्लास किती जुने आहेत यावर त्याचे युव्ही प्रोटेक्शन अवलंबून नसते. त्यामुळे तुमचे सनग्लास जुने असले तरीही ते उत्तम स्थितीमध्ये असल्यास त्याचा त्रास होणार नाही. 
 
 6) स्वस्तातल्या सनग्लासमुळेही काम होते - 
 
 लास्टिकचे लेन्स डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. सतत अशाप्रकारचे सनग्लास घातल्याने डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. 
 
 7) सनग्लास घातल्याने डोळे सुरक्षित राहतात - 
 
 फॅशन सनग्लासेसमुळे डोळ्यांना काहीच फायदा होत नाही. सनग्लास विकत घेताना युव्ही प्रोटेक्शन लेव्हल तपासून पहा.