मुंबई : कांजण्यांचा त्रास हा खूपच त्रासदायक असतो. प्रामुख्याने तो उन्हाळ्यात आणि लहान मुलांमध्ये झाला असल्यास त्याचा त्रास चिडचिड वाढवणारा असतो. पुरेशी काळजी घेतल्यानंतर कांजण्याचा त्रास आटोक्यात ठेवता येतो पण या त्रासामध्ये शरीरावर उठणारे पुरळ त्याचे डाग पुढील अनेक दिवस त्वचेवर राहतात. लहान मुलांनी कांजण्या फोडल्यास त्यातील पाणी शरीरावर पसरते परिणामी डाग अधिक गडद होतात.
कांजण्यांच्या या डागांचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.
कोरफड थंड स्वरूपाची असल्याने आणि सौंदर्यवर्धक असल्याने चेहर्यावरील, अंगावरील कांजण्यांचे डाग कमी करण्यास मदत करते. ताजा कोरफडीचा गर त्वचेवर चोळल्यास फायदा होता.
मधामध्येही त्वचेला खुलवण्याचे, अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याचे त्वचेवर खाज येणे, कांजण्यांचे डाग कमी होण्यास मदत होते. डागांवर नियमित मध लावून दीड- दोन तासांनी आंघोळ करा. दिवसातून दोनदा असं केल्याने चार - पाच दिवसातच कांजण्याचे दाग कमी होतात.
लसणाच्या तीन पाकळ्या दोन चमचे पाण्यात मिसळा. कापसाच्या बोळ्याने हे पाणी डागांवर लावा. पाच मिनिटांत पाण्याने आंघोळ करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ हा उपाय करू नका अन्यथा त्वचेला त्रास होऊ शकतो. नियमित या उपायाने 2-3 दिवसात डाग कमी होण्यास मदत होते.
आंघोळीच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा. या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेवरील कांजण्यांचे डाग कमी होतील.
पपपईचा पल्प आणि दूध, साखर एकत्र करून पेस्ट बनवा. या पेस्टला शरीरावर लावल्यानंतर 15 मिनिटांत आंघोळ करा. सलग 4-5 दिवस हा उपाय केल्याने कांजण्यांचे डाग कमी होण्यास मदत होते.
कांजण्याचा त्रास कमी करण्यासाठी कडुलिंब फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावा. सकाळी त्वचा स्वच्छ करा. सलग 7 दिवस हा उपाय केल्याने डाग, खाज कमी होण्यास मदत होते.
कांजण्यांचा त्रास कमी करण्यासाठी नारळाचं तेल फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलाने मालिश केल्याने डाग कमी होण्यास मदत होते.