मुंबई : निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. फ्रुट बॅट्स प्रजातीचं वटवाघुळ निपाह व्हायरसचा प्रमुख वाहक असल्याचे संगितले जात आहे. मात्र केरळमध्ये पसरत असलेल्या व्हायरसमागे वटवाघुळ नसल्याने या व्हायरसबाबतचं गुढ वाढले आहे.वटवाघुळांची लाळ फळांवर राहिल्याने, वटवाघुळांनी अर्धवट खाऊन टाकलेल्या फळांच्या संपर्कात आल्याने निपाह व्हायरसचा संसर्ग वाढतो त्यामुळे अशाप्रकारच्या फळांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 'या' गावात पहिल्यांदा आढळला जीवघेणा 'nipah virus'
केरळमध्ये 'निपाह'चा धोका वाढल्याने त्याचा परिणाम आता फळांच्या विक्रीवरही झाला आहे. सध्या आंबा, केळी, खजुर, चिकू अशी फळं न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण टणक आवरणापेक्षा मऊ सालीच्या फळांचं सेवन करणं वटवाघुळ पसंत करतात. त्यामुळे केरळमधून येणार्या अशा फळांची बाजारात खरेदी करताना काळजी घेणं आवश्यक आहे. वटवाघुळं प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस आंंबा,चिकू आणि पेरू खाणं पसंत करतात.
केरळच्या PJJ फ्रूट्सचे मालक जयसन यांच्यामते, निपाहच्या धोक्यामुळे लोकांनी फळांपासून दूर राहणं पसंत केले आहे. आंवा, पेरू, चिकू या फळांची विक्री घटली आहे. सफरचंद, किवी वगळता इतर फळांवर काही ट्रीटमेंट्स केल्या जातात त्यामुळे इतर फळांची गॅरेंटी घेतली जाऊ शकते. Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का? वाचा हा एक्सपर्ट सल्ला
त्रिसुर हॉर्टिकल्चर कॉलेजचे डीन जॉर्ज थॉमस यांच्या म्हणण्यानुसार, वटवाघुळ केवळ निवडक फळांची निवड करतात. फणस, कलिंगड, टरबूज अशा टणक सालीच्या फळांची ते निवड करत नाहीत. 'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात एकत्र फळं खातात.